Sharad Pawar NCP News Saam tv news
महाराष्ट्र

Sharad Pawar On Ajit Pawar : अजित पवारांसह NCPबद्दल तुफान चर्चा, पण शरद पवारांनी 2 मिनिटांत विषयच संपवला

Sharad Pawar Big Update: 'मी एकदा मुद्दा स्पष्ट केल्यानंतर तुम्हाला त्याला फाटे फोडण्याचा अधिकार नाही' असे म्हणत पवारांनी सर्व चर्चांचा विषयच संपवला.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणात आज वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत. आता तर त्यांना पक्षातील बहुतांश आमदारांनी देखील पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत. या सर्व चर्चांवर शरद पवारांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, ही जी काही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू इच्छितो की, राष्ट्रवादी पक्ष आणि या पक्षात काम करणारे सर्व सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. यापेक्षा दुसरा कोणताही विचार कोणाच्याही मनात नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी सांगितले की "मी आज माझा देहूला कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम संपल्यानंतर मी रात्री मुंबईला मुक्कामाला जाणार आहे. मी वर्तमानपत्रात वाचलं की अशी अशी एक आमदारांची बैठक आहे, ही शंभर टक्के खोटी बातमी आहे. पक्षाचे अध्यक्ष सध्या त्याच्या भागात मार्केट कमिटीच्या प्रचारात आहेत. अजित पवार देखील याच कामात इतरांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय या कामात लक्ष घालण्याची जबाबादारी तिसऱ्या कोणावरही नाही". त्यामुळे हे लोक ज्या त्या कामात गुंतलेले आहेत आणि मी ही माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करत आहे."

शरद पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर पत्रकारांनी आणखी खोलात जाऊन अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारले, तेव्हा शरद पवारांनी 'मी एकदा मुद्दा स्पष्ट केल्यानंतर तुम्हाला त्याला फाटे फोडण्याचा अधिकार नाही' असे म्हणत पवारांनी सर्व चर्चांचा विषयच संपवला. (Latest Marathi News)

भाजपचं राज्यात ऑपरेशन लोटस!

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरवात केली आहे. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे ४० आमदार फुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यात वज्रमूठ घेऊन पुढे जाणाऱ्या महविकास आघाडी खिंडार पाडण्याचा डाव भाजपने आखला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधीच मोठा घाव घालून महाविकासआघाडी खिळखिळी करण्याचा प्लान भाजपने आखाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT