Sharad pawar news Saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar: हिंदी सक्तीविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad pawar On Raj-Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी भाषा सक्तीविरोधात येत्या ५ जुलै रोजी एकत्र मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी सहभागी होणार की नाही? शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले.

Priya More

हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले आहेत. हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. ठाकरे बंधूंनी या मोर्चामध्ये सर्वच राजकीय पक्षांमधील मराठी माणसांनी आणि सर्वसामान्य जनतेने सहभागी होण्याचे आव्हान केले आहे. येत्या ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सहभागी होणार का? याबाबत शरद पवार यांनी स्पष्टपणेच सांगितले. 'तुम्ही सहभागी व्हा असं म्हटल्यावर होता येत असे नाही. भूमिका समजून घ्यावी लागेल.', असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांची आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या विषयांवर, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'पहिली ते चौथी हिंदी सक्तीची गरज नाही.पण पाचवीपासून पुढे हिंदी येणं गरजेचं आहे. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. दोन्ही ठाकरेंची भूमिका वाचली. मुबंईला गेल्यावर याबाबत त्यांना भेटेन.'

ठाकरे बंधूंनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'त्यांनी मोर्चात सहभागी व्हा असं म्हटलं आहे. त्यांचे भाष्य समजून घेतलं पाहिजे. तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर होता येत असे नाही, भूमिका समजून घ्यावी लागेल. जर महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय असतील तर भूमिका घेतली जाईल.'

शिवसेना-मनसे एकत्र येण्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 'शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगले आहे. ते एकत्र येतील की नाही हे मला माहिती नाही. कारण हे एकत्र येण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत.' अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत होणाऱ्या चर्चावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळे चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच आहे. सगळे मतभेद विसरून चांगलं काम केलं तर वाईट वाटायचं कारण नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT