Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा झटका, वरिष्ठ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Political News : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहे. दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्याने राजीनामा दिला आहे.

Yash Shirke

  • उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

  • यादरम्यान ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्याने राजीनामा दिला आहे.

  • तडकाफडकी राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

Maharashtra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यासाठी पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरेही दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान ठाकरे गटातील नेत्याने पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीला विठ्ठल मोरे हजर होते. बैठकीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मोरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे. विठ्ठल मोरे यांनी राजीनामापत्रक सोशल मीडियावर शेअर केले आहे.

'पक्ष कठीण परिस्थितीमध्ये असताना उपनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागत असल्यामुळे मला यातना होत आहेत. मागील १० वर्षांपासून मी शिवसेनेत आहे. पहिले ३ वर्षांमध्ये बेलापूर विधानसभा मतदार संघाचा संपर्कप्रमुख होता. त्यानंतर जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. उपनेतेपद देऊन नवी मुंबई महापालिका क्षेत्राची जबाबदारी सोपवून मला प्रोत्साहित केले. मातोश्रीचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून याचा मला नेहमीच अभिमान राहिल', असे विठ्ठल मोरे यांनी म्हटले आहे.

'माझ्या हॉटेलवर एकनाथ शिंदे यांनी छापा टाकायला लावला, अनधिकृत बांधकान नसूनही मध्यरात्री साडेतीन वाजता माझ्या हॉटेलवर तोडक कारवाई करण्यात आली. हा प्रकार तीनदा होऊनही पक्षातून राजीनामा देण्याची माझी मानसिकता झाली नाही. पण एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते काम राजन विचारे यांनी सहज केले. माझ्या मनात खेद आहे', असे विठ्ठल मोरे यांच्या सोशल पोस्टमध्ये लिहिलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Maharashtra Live News Update: वसई विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी पी यांची नियुक्ती

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

SCROLL FOR NEXT