दिल्ली, ता. ५ ऑगस्ट २०२४
Sanjay Raut Criticizes Raj Thackeray: 'धारावीचा भूखंड अदानीच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू आहे, तो सौदा आम्ही होऊ देणार नाही. आमचं सरकार आल्यावर धारावीच टेंडर रद्द करू असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. धारावीबाबत आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे, धारावी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही,' असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अदानींविरोधात दंड थोपटले आहेत. दिल्लीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचाही समाचार घेतला.
महाराष्ट्राचे मणिपूर होण्यासाठी शरद पवार यांनी हातभार लावू नये, असे म्हणत महाराष्ट्र राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे. "त्यांनी राजकारणत परत नव्याने सुरुवात केली आहे. ते दरवर्षी नव्याने राजकारणाची सुरुवात करतात. त्यांचं राजकारण मॅच फिक्सिंगवर सुरू असतं," असा सणसणीत टोला संजय राऊतांनी लगावला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी नेहरूंचा दाखला देतात. संसदेच्या कार्यकाळात कस वागावं हे नेहरूंनी सांगितले. नेहरू, पटेल यांनी संसदीय कार्यपद्धती काय असते हे त्यांनी दाखवून दिले. संसदेच्या कार्यकाळात ते नेहमी उपस्थित राहायचे. विशेषतः विरोधी पक्षनेत्यांचे भाषण असताना ते संसदेत हजेरी लावण्याचा प्रयत्न करायचे, असे म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदींवरही हल्लाबोल केला.
"देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही. अनिल देशमुखांच्या खुलाश्यावर फडणवीसांना एका गुन्हेगाराची प्रवक्ता म्हणून मदत लागते. चांदिवाल आयोगाचा अहवाल समोर का येत नाही? त्याचा अहवाल कधीही सादर होऊ शकतो म्हणून त्यांनी आमचे सरकार पाडले, असे म्हणत देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चा लिंबू आहेत," असा टोला त्यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.