MP Sanjay Raut Latest Marathi News saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने २ जानेवारीचीच तारीख का दिली? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut On Maratha Reservation: राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले.

Gangappa Pujari

Sanjay Raut News:

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेताना जरांगे पाटलांना २ जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र सरकारने मराठा आरक्षणासाठी २ जानेवारीचीच मुदत का दिली? याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.

काय म्हणालेत संजय राऊत?

"मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी २४ डिसेंबर तर सरकारने २ जानेवारी ही डेडलाईन दिली आहे. पण ३१ डिसेंबरनंतर राज्यातील हे बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार कोसळणार हे एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) माहित आहे. म्हणूनच जरांगेंनी अत्यंत शहाणपणाने २४ डिसेंबर ही तारीख दिल्याचे" संजय राऊत म्हणाले.

"तसेच ३१ डिसेंबरनंतर सरकार राहणार नाही, त्यामुळेच आरक्षणाची जबाबदारी घ्यायला एकनाथ शिंदे तयार नाहीत, असे म्हणत सरकारने मराठा आरक्षणाबद्दल दिलेले आश्वासन हे बेभरवशी आहे का?" अशी शंकाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष अधिवेशन बोलावल्याशिवाय पर्याय नाही..

दरम्यान, "मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमित शहा किंवा उपमुख्यमंत्री का बोलत नाहीत? भाजपचे टिल्ले आणि पोपट आरक्षणावर बोलत आहेत, असे म्हणत या निर्णयासाठी विशेष अधिवेशन बोलावल्याशिवाय पर्याय नाही.." असेही संजय राऊत म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT