Sanjay Raut Eknath Shinde News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'PM मोदी, शहांच्या इशाऱ्यानंतर निवडणुका लागतील', CM शिंदेंच्या दाव्यावरुन संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut On CM Eknath Shinde: तिथे चीफ जस्टीस तारखा देत आहेत आणि इथे निवडणूक आयोग तारखा देत आहेत. काय चाललंय ? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई|ता. १६ सप्टेंबर

Sanjay Raut News: राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे विधान केले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूका होतील, तसेच राज्यात दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. निवडणुका कधी होतील हे मुख्यमंत्री निश्चित करणार नाहीत ते निवडणूक आयोग ठरवेल. त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्री शहा यांनी इशारा दिल्यावर निवडणूका होतील. तिथे चीफ जस्टीस तारखा देत आहेत आणि इथे निवडणूक आयोग तारखा देत आहेत. काय चाललंय ? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

काय म्हणाले संजय राऊत?

"विधानसभेच्या निवडणुका कधी होतील हे मुख्यमंत्री निश्चित करणार नाही. त्यांनी निवडणूक आयोगाचा पदभार स्विकारला आहे का? न्यायालयाचा निकालही आधीच सांगतात. निवडणूकाच्या तारखा आयोग ठरवेल. त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्री शहा यांनी इशारा दिल्यावर निवडणुका होतील. देशात निवडणूक आयोग स्वतंत्र आणि निष्पक्ष नाही. भाजप नेत्यांच्या सोईनुसार निवडणुकांच्या तारखा, शेड्युल तयार होईल, असे संजय राऊत म्हणाले.

निवडणुका झाल्यास घरी जाल..

तसेच "जवळपास १४ महानगरपालिकेच्या निवडणुका पराभवाच्या भितीने होत नाहीत. हिंमत असेल तर इथे निवडणुका घ्या. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. तुम्ही इथे निवडणुका घेत नाही. ती वर्षांपासून इथे नगरसेवक नाहीत. पुणे, नाशिक, संभाजीनगरला निवडणूका नाहीत. तिथे चीफ जस्टीस तारखा देत आहेत आणि इथे निवडणूक आयोग तारखा देत आहेत. काय चाललंय काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच ज्या तारखेला निवडणूका होतील, त्या दिवशी घरी जाईल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

PM मोदींवर निशाणा...

महायुतीमध्ये स्ट्राईक रेटवरुन जागा वाटप केले जाईल, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. यावरुनही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. त्यांचा कसला स्ट्राईक रेट आहे. गद्दारी, लुटमारी, खोटे बोलण्यात, भ्रष्टाचार यात त्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे. कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेचा ढोल वाजवला जात आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी झारखंडमधील लाडकी बहीण योजनेवर टीका केली. अशा योजना, बोगस भंपक असून ही लाडक्या बहीणींची फसवणूक आहे असं मोदी म्हणाले. याच न्यायाने महाराष्ट्रातील योजनाही भंपक आहे, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार म्हणाला जय गुजरात, हा गद्दार रुकेगा नही साला - उद्धव ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT