Sanjay Raut News Saamtv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'राम मंदिर उद्घाटनावेळी धर्मांधतेचा आगडोंब उसळेल...' संजय राऊतांचा मोठा दावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Raut On BJP: अयोध्येतील श्री राम मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षा जानेवारीमध्ये या मंदिराचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. याच पाश्वभूमीवर संजय राऊत यांनी राम मंदिराच्या लोकार्पणावेळी हिंसाचार होण्याची शक्यता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वर्तवली आहे. माध्यमांशी बोलताना राऊतांनी याबद्दल भाजपवर गंभीर आरोप केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनावेळी भाजपा (BJP) सरकारकडून मोठा हल्ला केला जाऊ शकतो.. अशी शक्यता जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी वर्तवली होती. लातूरच्या सभेत उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) मलिकांच्या या वक्तव्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता राऊतांनीही यावर मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवलं गेलंय.." असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

तसेच यावेळी पुढे बोलताना "अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल अशी भिती सर्वच राजकीय पक्षांना वाटत आहे. इंडियाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. पण आम्ही अत्यंत सावध आहोत.." असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्तार कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटात सामील होताच हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

India vs New Zealand : विराट कोहली आणि सरफराजने डाव सावरला; भारताचं जोरदार कमबॅक, न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT