Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'मोदी विष्णूचा तेरावा अवतार, ते पोस्टर म्हणजे निर्लज्जपणा..' संजय राऊत भाजपवर भडकले

Sanjay Raut News: उद्धव ठाकरे यांना निमंत्रन देण्याची गरज नाही आम्ही आधीपासून अयोध्येत आहोत, आम्ही सर्व जण अयोध्येत जाऊ..." असे राऊतांनी स्पष्ट केले.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. २६ डिसेंबर २०२३

Sanjay Raut News:

नववर्षात २२ जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पाहणार आहे. या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच राजकीय वातावरणही तापू लागले आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झालेत. 'उद्धव ठाकरे यांना निमंत्रन देण्याची गरज नाही आम्ही अयोद्धेतच आहोत, सर्व जण अयोध्येला जाऊ..' असे म्हणत संजय राऊतांनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केलीय.

पोस्टरवरुन टीकास्त्र...

"मंदिरात जाणारा हा भक्त असतो, पण या मंदिरात जाणारा देशातील एकमेव VIP म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi). विष्णूचे १३ वे अवतार नरेंद्र मोदी रामाचं बोट धरून मंदिरात नेत आहेत, असं पोस्टर भाजपाने छापलं. हे पोस्टर कोट्यवधी राम भक्त्यांच्या भावना दुखावणारे आहे. हा निर्लज्जपणा आहे.. अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. आम्ही सामान्य म्हणून राम मंदिराच्या लढ्यात उतरलो तेव्हा हे व्हिआयपी कुठे होते?"असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

आम्ही अयोध्येत जाणार...

"जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे पाय लावून पळाले होते. त्यावेळी भाजपने घाबरुन शिवसेनेवर खापर फोडलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली. असे राऊत म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रन देण्याची गरज नाही आम्ही आधीपासून अयोध्येत आहोत, आम्ही सर्व जण अयोध्येत जाऊ..." असे राऊतांनी स्पष्ट केले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फडणवीसांवर टीका..

"अयोध्येसाठी आम्ही काय केल? हे कुठल्या तोंडानं विचारतायं. बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले, "हे आमचं काम नाही" म्हणारे आता छाताडाची भाषा करत आहेत. सत्तेमुळे छाताड आता फुगली असतील तेव्हा तुमची छाताडे कुठे गेली होती? असे म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) टीका केली. आम्हाला सत्तेचा माज दाखवू नका रामभक्ती आणि हिंदुत्व आम्हाला शिकवू नका..." असा इशाराही राऊतांनी यावेळी दिला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT