Nitin Bangude Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: जाहिरातीवर खर्च केला नसता तर..., 'लाडकी बहीण' योजनेवरून ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर निशाणा

Nitin Bangude Patil Criticized Mahayuti Government: तानाजी सातपुते शिवसेनेचे उमेदवार नसून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि निवडणुकीच्या आधी सर्व सामान्यांचा आमदार असल्याचे नितीन बानगुडे पाटील यांनी जाहीर केले.

Priya More

विजय पाटील, सांगली

शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. 'लाडक्या बहिणींना १५०० रुपये देऊन जाहिरात बाजी केली. जर जाहिरातीवर खर्च केला नसता तर लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळाले असते.', अशी टीका नितीन बानगुडे यांनी सरकारवर केली. मिरज येथे महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. तानाजी सातपुते शिवसेनेचे उमेदवार नसून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि निवडणुकीच्या आधी सर्व सामान्यांचा आमदार असल्याचे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले.

मिरज विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. शिवसेना उपप्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली. तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ दणक्यामध्ये ही सभा पार पडली. यावेळी महायुती सरकारवर टीका करण्यात आली.

दरम्यान, मिरज राखीव मतदारसंघातून भाजपचे कामगारमंत्री सुरेश खाडे हे सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरेश खाडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते तानाजी सातपुते निवडणूक लढवणार आहेत. अशामध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्थानिक नेते किती मदत करतात यावरच सुरेश खाडे विरूद्ध तानाजी सातपुते यांच्या विजयाची समीकरणे अवलंबून आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून सध्या आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जोरदार सभा सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT