Sadabhau Khot News Saamtv
महाराष्ट्र

Sadabhau Khot: ठरलं! लोकसभा निवडणुकीत आम्ही महायुतीसोबत; हातकणंगलेमधून निवडणूक लढणार.. सदाभाऊ खोत यांची घोषणा

Maharashtra Politics News: आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही महायुतीसोबत जाणार आहोत, असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १० मार्च २०२४

Loksabha Election 2024:

आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही महायुतीसोबत जाणार आहोत, असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच हातकणंगलेमधून लोकसभा निवडणुक लढणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

"रयत क्रांती संघटनेची तातडीनं बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणुकीच्या आधी महत्वाची बैठक घ्यायची होती. जिल्हा पातळीवरील आढावा आज बैठकीत घेतली. शेतकरी, गावपातळीवर काय चर्चा आहे याची माहिती घेतली. काही ठराव आम्ही केले. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही महायुतीत आहोत," असे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले.

"हातकणंगले लोकसभा जागा रयत क्रांती संघटनेला म्हणजे आम्हाला मिळाली पाहिजे ही घोषणा आज आम्ही केली. तिथं आम्ही लढणार आणि जिंकणार पणं. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारत विरुद्ध इंडिया असा नारा आम्ही देणार आहे. इंडिया आघाडीत सगळे लुटारू आहेत. त्याच्या विरुध्द आम्ही लढत आहोत," असेही सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे.

"हातकणंगलेमध्ये आम्ही आधीपासूनच तयारी केली होती. तो सातबारा आमचाच आहे. आधी आम्ही दुसऱ्याला दिला. समोर कोण येणार हे महत्वाचं नाही. आम्ही लढणार आहे. रयत क्रांती संघटनेला जर हातकणंगले सोडलं नाही तर मोठा मेळावा तिथं घेऊन पुढील दिशा ठरवू," असेही त्यांंनी यावेळी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT