Maharashtra Politics Latest News: Saamtv
महाराष्ट्र

RSS On Ajit Pawar: 'राष्ट्रवादीसोबत युतीवरून पुन्हा खडेबोल', संघाच्या साप्ताहिकामधून भाजपला 'विवेकी' कानपिचक्या; VIDEO

Tanmay Tillu

मुंबई, ता. १८ जुलै २०२४

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचं मराठी साप्ताहिक विवेकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीवरून भाजपचे कान टोचलेत. त्यामुळे अजितदादांशी केलेला घरोबा संघाला रुचलेला नाही हे पुन्हा अधोरेखित झालंय. यातूनच लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील संबंध दुरावल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

विधानसभेला अजितदादा नको असा स्पष्ट संदेश संघ भाजपला वारंवार देतोय का असा सवाल उपस्थित झालाय. तर दुसरीकडे महायुतीतून अजितदादा थेट बाहेर पडल्यास विरोधकांना आयतं कोलीत मिळणार आहे. त्यामुळे सुंठीवाचून खोकला घालवण्याचा तर भाजपचा प्रयत्न नाही ना अशी चर्चा आता रंगली आहे.

ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्याआधी अजित पवारांचा निकाल लावायचा अजेंडा संघाच्या रडारवर तर नाही न असा सवाल या टीकेतून उपस्थित होतो. दुसरीकडे अजित पवारही तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीतील निर्वाणीची पेरणी सध्या सुरु असल्याचं दिसत आहे.

मराठीत एक म्हण आहे लेकी बोले सुने लागे, संघाच्या कानपिचक्यांनी त्याचीच प्रचिती येते. मातृसंस्था संघ भाजपला कानपिचक्या देतानाच अप्रत्यक्षरित्या अजितदादांनाच बाहेर पडा हे सांगू बघतोय. दुसरीकडे शिंदेंकडे भाजपप्रमाणे कॅडर नाही, त्यामुळे किती जागांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंसाठी राबायचं हाही सवाल कार्यकर्त्यांच्या मनात आता घर करतो. म्हणूनच भाजपला विवेकी कानपिचक्या देताना कार्यकर्ता खचलेला नाही,मात्र तो संभ्रमात आहे हा इशारा संघ समविचारी साप्ताहिकांमधून देऊ बघतोय...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

Maharashtra News Live Updates: तुळजापूर बोगस मतदान नोंदणी अर्ज प्रकरणाला राजकीय वळण

SCROLL FOR NEXT