Raj Thackeray-Ramdas Athwale News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज ठाकरेंना NDA मध्ये घेण्याची गरज नाही, ते आल्याने फार फायदा होणार नाही : रामदास आठवले

Raj Thackeray-Ramdas Athwale News : राज ठाकरे युतीसाठी भेटलेले असावेत वाटत नाही. मात्र ते आल्याने फार फायदा होईल, असं मला वाटत नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम | रायगड

Political News :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीबाबत बोलताना, राज ठाकरे यांना घेण्याची आवश्यकता नाही, असं स्पष्ट मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

रामदास आठवले यांनी म्हटलं की, राज ठाकरे हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. वास्तविक आमची भूमिका ही आहे की राज ठाकरे यांना सोबत घेण्याची गरज नाही. राज ठाकरेंबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. पण राज ठाकरे युतीसाठी भेटलेले असावेत वाटत नाही. मात्र ते आल्याने फार फायदा होईल, असं मला वाटत नाही. त्यामुळे वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

राहुल गांधी देखील एनडीएमध्ये येतील

परंतु सगळेच आता इकडे (एनडीए) येऊ लागले आहे. काँग्रेसचे लोक देखील एनडीएमध्ये येत आहेत. सध्या काँग्रेसमधून एवढे लोक बाहेर पडत आहेत की शेवटी सोनिया गांधी आणि राहुल गांधीच तेथे राहतील अशी स्थिती आहे. एक दिवस राहूल गांधींना देखील इकडे यावं लागेल असं रामदास आठवले यांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला

'उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. उद्धव ठाकरे ऐकणार नाहीत, त्यांचा जळफळाट झालाय. त्यांना आपले आमदार सांभाळता आले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच भाजपसोबत युती केली असती, तर त्यांना ही नामुश्की आली नसती. मी त्यांना सांगितल होतं की, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ नका', असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT