Rahul Gandhi And Rahul bondre Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! राहुल गांधींचा एक फोन अन् निर्णय बदलला, राहुल बोंद्रेचा भाजप प्रवेश अखेर रद्द

Rahul Bondre News Update: काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी मोठा निर्णय घेतला. राहुल गांधी यांच्या फोननंतर त्यांनी भाजप प्रवेश रद्द केला.

Priya More
  • बुलडाण्याचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द

  • राहुल गांधींच्या फोननंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

  • राहुल गांधींच्या फोननंतर राहुल बोंद्रे यांचा निर्णय बदलला

  • राहुल बोंद्रे काँग्रेसमध्येच राहणार असल्याची माहिती समोर

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी मोठा निर्णय घेतला. राहुल बोंद्रे हे भाजपच्या वाटेवर जाणार होते. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या एका फोननंतर राहुल बोंद्रे यांनी आपला निर्णय बदलला. त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय रद्द केला. राहुल गांधी यांच्याशी फोनवर बोलताना राहुल बोंद्रे भावुक झाले.

त्यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्या असल्याचे सांगितले जात आहे. राहुल बोंद्रे यांनी सोमवारी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर बुलडाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पण अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय रद्द केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

राहुल गांधी यांनी चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांना फोन केला. संकटाच्या काळात धीर सोडू नका असे आवाहन राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना केले. निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत राहुल बोंद्रे यांनी राहुल गांधी यांना शब्द दिला. राहुल गांधी यांनी आवाहन केल्यानंतर राहुल बोंद्रे यांनी आपला भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलला असल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधींच्या एका फोनवर राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशात मोठा ट्विस्ट आला.

राहुल बोंद्रे यांनी काँग्रेस सोडू नये यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर रात्री राहुल बोंद्रे यांना राहुल गांधींचा फोन आला. राहुल बोंद्रेंच्या भाजपा पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला चिखलीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आणि बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द झाला. राहुल गांधी यांच्याशी फोनवर बोलताना राहुल बोंद्रे हे भावुक झाले होते. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

गेल्या दोन महिन्यापासून चिखली मतदारसंघातील राजकारण हा चर्चेचा विषय राज्यभरात ठरला आहे. चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सोमवारी फेसबुक लाईव्ह करत भाजपामध्ये पक्ष प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.२२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होऊ शकतो असं चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांनी सुद्धा दुजोरा दिला होता. मात्र सोमवारी सायंकाळी या संपूर्ण घटना क्रमात एक मोठा ट्विस्ट आला.

राहुल गांधींनी थेट राहुल बोंद्रेंना व्हाट्सअप कॉल करत त्यांची मनधरणी केली शिवाय "हार के बाद ही जीत है" असा कानमंत्र ही दिला. या संपूर्ण घटनाक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केल्याची माहिती त्यांनी दिली. राहुल गांधींशी बोलताना राहुल बोंद्रे यांनी "मै सबकुछ न्योछावर कर दूंगा लेकिन आपके साथ लढाई लढूंगा....!" असंही म्हटलं. या संपूर्ण घटनाक्रमाचा आणि फोन कॉलचा व्हिडिओ राहुल बोंद्रे यांच्या कार्यालयाकडून फेसबुकवर टाकण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कालव्यातील पाण्याची नासाडी

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

Navratri Fasting Recipe : नवरात्रीत उपवासाला गोड खाण्याची मजाच वेगळी, 'असा' बनवा मऊसूत रताळ्याचा शिरा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

SCROLL FOR NEXT