Uddhav Thackeray Meet Sharad Pawar At Silver Oak saam tv
महाराष्ट्र

Maha Vikas Aghadi News: पवार-ठाकरेंमध्ये तब्बल १ तास खलबतं, महाविकासआघाडीबाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे यांनी आज सिल्व्हर ओक या निवसस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली.

Chandrakant Jagtap

>> निवृत्ती बाबर

Uddhav Thackeray Meet Sharad Pawar At Silver Oak: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. या भेटीत नेमकं काय घडलं याबबात जनतेत उत्सुकता आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये महाविकासघाडी म्हणून प्रामाणिकपने लढण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी आज सिल्व्हर ओक या निवसस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली.

राज्यासोबत केंद्रातही तिन्ही पक्षांमध्ये एकी कायम राहिली पाहिजे असे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले. तसेच जे संविधानाच्या विरोधात आहेत, त्यांच्या विरोधात आपण महाविकासआघाडी म्हणून लढायचं असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

अदानींबाबत पवारांनी घेतलेली भूमिका, सावरकर प्रकरणी शिवसेनेनी घेतलेली भूमिका याबाबत तिन्ही पक्षात समन्वय साधला गेला नसल्याचं आत्तपर्यंत निदर्शनास आले होते. परंतु आता यापुढे असं होऊ नये यासाठी काळजी घेण्याबाबात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे-पवार भेटीवर विनायक राऊत म्हणाले...

"महाविकास आघाडीचे नेते आहे. विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी ही भेट होत आहे. ज्या पद्धतीने भाजपचे नेते चंद्रकांत पाटील असो की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असो बकवासगिरी करत आहे. तसं महाविकास आघाडीत काहीच नाही. महाविकास आघाडीत कुठलीही बिघाडी नाही. चर्चा करणारे हे मिंधे गट आणि भाजप आहेत. आज आम्ही एकोप्याने महाराष्ट्रात आहोत", अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी केली आहे.

महाविकासअघाडीत मदतभेद - उदय सामंत

"छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित नव्हते. पवारांचे देखील बदललेले सूर आणि ईव्हीएमबाबत अजितदादांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया यावरून महाविकास आघाडीत सर्व काही ठिक नाही असे दिसतंय. बहुदा यावरूनच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पवारांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली असावी अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांन दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT