Opposition Party Met Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार? विरोधी पक्षाने घेतली फडणवीसांची भेट

Opposition Party Met Fadnavis: महाराष्ट्राच्या विधानसभेत महाविकास आघाडीला अपेक्षित संख्याबळ न मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता धुसर आहे. मात्र महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नेमकं त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. एवढंच नाही महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेलं 29 जागांचं संख्याबळही गाठता आलं नाही. मात्र आता महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय. तर महाविकास आघाडीने फडणवीसांची भेट घेऊन दिल्लीप्रमाणे विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केलीय. तर फडणवीसांनी याआधीच अध्यक्षांकडे बोट दाखवलंय.

महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली जात असताना राहुल नार्वेकरांनी मात्र आपण विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर योग्य निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय. याआधीही विरोधी पक्षनेतेपदाबाबत असाच पेच प्रसंग निर्माण झाला होता... तो नेमका कसा? पाहूयात.

विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार?

दिल्लीत 3 जागा असतानाही 'आप'ने भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिलं

1986

समाजवादी काँग्रेसच्या विलिनीकरणानंतर काँग्रेसने शेकाप आणि जनता पक्षाला विरोधी पक्षनेतेपद सोपवलं

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित संख्याबळ नसल्याने भाजपने युपीएला विरोधी पक्षनेतेपद नाकारलं होतं... मात्र महाराष्ट्रात समाजवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर काँग्रेसनं शेकाप आणि जनता पक्षाला विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याचं औदार्य दाखवलं होतं. त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजप लोकसभेचा कित्ता गिरवणार की महाविकास आघाडीचं एकत्रित संख्याबळ मान्य करून महाराष्ट्राची परंपरा जपणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

SCROLL FOR NEXT