OPERATION TIGER 3 SOON? NARESH MHASKE'S CLAIM SPARKS FRESH POLITICAL STORM IN MAHARASHTRA saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आता लवकरच 'ऑपरेशन टायगर 3'? शिवसेना खासदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Operation Tiger 3 : ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे 'ऑपरेशन टायगर ३'ची चर्चा सुरू झाली आहे. म्हस्के यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Bharat Jadhav

  • 'ऑपरेशन टायगर ३'ची चर्चा सुरू

  • ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर राज्यात नव्या राजकीय चर्चांना उधाण

  • नगरसेवकांनाही लक्ष्य केलं जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना चर्चा

ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. सर्व खासदारांनी मंगळवारी रात्री दिल्लीत जाऊन नवीन गट स्थापन केला. खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील मान्यता दिली सुद्धा आहे. राज्यात ऑपरेश टायगर यशस्वी झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे. ही फोडाफोडीचं राजकारण शांत होत नाही तोच नव्या ऑपरेशन टायगर -३ ची चर्चा सुरू झाली आहे.

ठाकरे गटातील खासदार, आमदार पक्ष नेतृत्त्वावर नाराज असून ते पक्ष सोडून जात आहेत. इतकेच नाही तर नगरसेवकांमध्ये सुद्धा नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पुढच्या ऑपरेशन नगरसेवकांना टार्गेट करत त्यांना फोडलं जाणार का असा सवाल राजकीय वर्तुळातून केला जातोय. त्याला कारण ठरलंय, शिंदे गट शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचं विधान. हो, नरेश म्हस्के यांनी त्याबाबत विधान करत राजकीय वर्तुळ नवीन वादळ उठवून दिलंय.

ठाकरे गटाचे खासदार दिल्लीला जात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत वेगळा गट स्थापन करण्याची मंजुरी मागितली. लोकसभा अध्यक्षाच्या समोर सर्व खासदारांनी त्या पत्रावर सह्या केल्या. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मंजुरी दिली आहे. फुटीर खासदारांकडे एक तृतीयांश नंबर असल्यानं त्याच्या गटाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत फुटीर खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देताना तिसऱ्या ऑपरेशन टायगर राबवण्यात येणार असल्याचे संकेत दिलेत. त्याच्या म्हणण्यांनुसार येत्या काळात पुन्हा एकदा ठाकरे गटाला खिंडार पडू शकते. खासदारानंतर आता मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाला भगदाड पडण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे नगरसेवकही त्यांची साथ सोडणार असल्याचं म्हस्के यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंवर खासदार,आमदार नाराज आहेत, इतकेच नाही तर नगरसेवकही नाराज आहेत. सर्वजण सोडून जात आहेत. आमच्यासोबत आमदार, खासदार आणि कार्यकर्ते जुडत आहेत. -
शिंदे गट, खासदार नरेश म्हस्के

ठाकरे गटातील नेते का नाराज आहेत?

काही दिवसांपासून ठाकरे सेनेतील नेते पक्ष नेतृत्त्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. मतदारसंघातील कामांना प्रतिसाद मिळत नाहीये. स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाची होत असलेली घसरण तसेच आदित्य ठाकरे दौरे करत नसल्यानं नेते मंडळी नाराज आहेत. मतदारसंघात नेत्याची लोकप्रियता घसरत असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का! महापालिकेतील नगरसेविकेचं पद जाणार? काय आहे कारण?

मित्राला वाचवताना दोघेही खदानीत बुडाले; तिघांच्या मृत्यूनं गावावर शोककळा

जगात सर्वाधिक पाऊस मुंबईत, 5 दिवसांत 920 मिमी पावसानं वाढवलं टेन्शन? समुद्राची पातळी वाढणार, मुंबई बुडणार?

मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा

4 महिन्यांपूर्वीच सिया-चेतनचं गुपचूप लग्न? व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठं गूढ उकलणार?

SCROLL FOR NEXT