Ajit Pawar Group NCP Opreation Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'बाप लेकीला सोडून दादांकडे चला'; शरद पवारांच्या खासदारांसाठी 'ऑपरेशन घड्याळ'

Ajit Pawar Group NCP Opreation: अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिली जात आहे. राज्यात ऑपरेशन घड्याळ सुरू झालंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचा दारुण पराभव केल्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षाने खासदारांनाही गळाला लावण्याची रणनीती आखलीय. मात्र दादांच्या पक्षाला ऑपरेशन घड्याळची गरज का पडलीय? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे आणि त्याला निमित्त ठरलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेचं ऑपरेशन घड्याळ.

ऑपरेशन घड्याळ राबवण्यासाठी पवारांच्या 7 खासदारांना संपर्क केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आणि एकच खळबळ उडालीय. आव्हाडांपाठोपाठ आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांनीही अधिवेशन काळात सोनिया दुहान यांच्यामार्फत 7 खासदारांना संपर्क केल्याचा दावा केलाय. तर सुनील तटकरेंनी मात्र पवारांचे खासदार फोडून ऑपरेशन घड्याळ राबवत असल्याचा दावा फेटाळून लावलाय.

तटकरेंनी दावा फेटाळला असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ऑपरेशन घड्याळाची गरज का आहे? पाहूयात.

पवारांच्या खासदारासाठी ऑपरेशन घड्याळ का?

मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागासाठी 6 खासदारांमागे 1 मंत्रिपदाचा फॉर्म्युला

पवारांचे 7 खासदार सोबत गेल्यास दादांच्या पक्षाचं संख्याबळ 8 वर जाणार

संख्याबळ वाढल्यास प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यानंतर खासदारांमध्ये चलबिचल सुरु झाल्याची चर्चा रंगलीय.. त्यामुळे पवारांचे खासदार दादांच्या गळाला लागणार की पवारांसोबत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT