Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: इतके अपयशी गृहमंत्री महाराष्ट्राने पाहिले नव्हते...; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Sanjay Raut On Devendra Fadnavis: त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांनी मोठी आगपाखड केली आहे.

Ruchika Jadhav

Lalit Patil Case:

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलेलं दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडतायत. काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर (ठाकरे गट) गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांनी त्यांच्यावर मोठी आगपाखड केली आहे.

किती खोटं बोलतायत गृहमंत्री. एकतर त्यांचे त्यांच्या खात्यावर नियंत्रण नाही, किंवा त्यांना त्यांचा गुप्तचर विभाग चुकिची माहिती पुरवत आहे. इतके अपयशी गृहमंत्री महाराष्ट्राने आजवर पाहिले नव्हते, अशा शब्दांत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

अंमली पदार्थांप्रकरणी ललित पाटीलला २०२० डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो नाशिकमध्ये शिवसेना प्रमुख होता. पुढे त्याला १४ दिवसांचा पीसीआर देण्यात आला. पीसीआर मिळाल्यावर त्यासा ससून रुग्णालयात अॅडमीट करण्यात आलं होतं. त्यावेळीच त्याची चौकशी का करण्यात आली नाही? तेव्हा गृहमंत्री जबाबदार होते की मुख्यमंत्री?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला होता.

पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंवर देखील आरोप केले आहेत. ललित पाटीलला शिवबंधन बांधण्यात आलं होतं, मात्र त्याला कोणतंही मोठं पद देण्यात आलं नव्हतं. विशेष म्हणजे दादा भूसे स्वत: त्याला घेऊन आले होते. हा माझा खास माणूस आहे. याला आपण शिवबंधन बांधावे, असं दादा भुसेंनी म्हटल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत ९ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे; गाल ओढले, पॅन्टमध्ये हात घालून गुप्तांगाला स्पर्श केला अन्...

Home Facial: पार्लरला जाऊन न जाता घरच्याघरी फेशियल कसं करायचं? लिंबू, मधाच्या फेस पॅकने मिळवा ग्लोइंग स्कीन

Maharashtra Nagar Parishad Live : सांगलीत पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

निवडणुकांमध्ये पैशांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर होतोय; सुप्रिया सुळे संतापल्या, निवडणुका रद्द करण्याची मागणी|VIDEO

How To Clean Gas Burner: गॅसवरचा बर्नर कसा स्वच्छ करायचा?

SCROLL FOR NEXT