Nilam Gorhe Comment On Shinde Group saam Tv
महाराष्ट्र

Nilam Gorhe: 'शिंदे गट' म्हणून नका, असं का म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

Nilam Gorhe Comment On Shinde Group: शिंदे गट खरी शिवसेना आहे. त्यामुळे गट हा शब्द पुसून टाकला पाहिजे, असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या. पण त्या असं का म्हणाल्या आहेत ते जाणून घेऊ.

Bharat Jadhav

आता खरी शिवसेना आपलीच आहे. पण अजूनही अनेकजण शिंदे गट म्हणतात. पण गट हा आता शब्द आपण पुसून टाकला पाहिजे. निवडणुकीत शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना हे आपल्याला मिळालंय आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आपल्याला भेटले आहे, असे विधान नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्या सांगलीमध्ये महिला मेळावामध्ये बोलत होत्या.

एकनाथ शिंदे यांनी २१ जून २०२२ रोजी शिवसेनेला जोरदार धक्का दिला आणि उभ्या शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर शिवसेनेच्या एका ग्रुपला ठाकरे गट आणि दुसऱ्या गटाला शिंदे गट म्हटलं जाऊ लागलं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं.

सांगलीच्या २०१९ च्या पुरानंतर खूप अस्वच्छता होती. ही अस्वच्छता दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यावेळी पुढे सरसावले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नव्हते. मात्र ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सांगलीकरांच्या मदतीला धावले, त्यामुळेच सांगलीच्या श्री गणेशाच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असेही त्या म्हणाल्या.

लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करणार आहोत. लाडक्या बहिणी योजनेच्या पैशामुळे बँकांना कोट्यावधी रुपयाचे व्याज मिळाले. त्यामुळे बँकांनी बँकेत आलेल्या महिलांना किमान बसायला खुर्ची तर द्यावी, असेही गोऱ्हे म्हणाल्या. बचत गटाकडे जर कोण पैसे मागत असेल तर शिवरायांचे जे तत्व होतं की, "चुकीला माफी नाही" असा प्रयोग करायला एकनाथ शिंदेंना सांगायला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

Weight Loss: ना जिम ना कठोर डाएट; पैसे खर्च न करता करा वजन कमी, जाणून घ्या हा फायदेशीर उपाय

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT