Maharashtra Politics Saam tv news
महाराष्ट्र

भाजपविरोधात भूमिका घेतली, नेत्याची थेट पक्षातूनच हकालपट्टी, ६ वर्षांसाठी निलंबित

BJP Cracks Down: प्रकाश टेकाडे यांची पक्षविरोधी भुमिकेमुळे भाजपमधून हकालपट्टी. नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी ६ वर्षांसाठी निलंबित केलं.

Bhagyashree Kamble

  • प्रकाश टेकाडे यांची पक्षविरोधी भुमिकेमुळे भाजपमधून हकालपट्टी.

  • नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी ६ वर्षांसाठी निलंबित केलं.

  • टेकाडे यांनी सोशल मीडियावर पक्षाविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप.

राजकीय वर्तुळातून हादरवणारी बातमी समोर येत आहे. पक्षविरोधी भुमिका घेणारे नागपूर जिल्ह्यातील भाजप नेते प्रकाश टेकाडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी टेकाडे यांना ६ वर्षांसाठी निलंबित केलं असल्याची माहिती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर कारवाई केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी ६ वर्षांसाठी प्रकाश टेकाडे यांना निलंबित केलं आहे. पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान, टेकाडे यांनी सोशल मीडियाद्वारे पक्षविरोधी भुमिका घेतली होती. या कारणावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोहर कुंभारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप पक्षात प्रवेश केला. दरम्यान, याला प्रकाश टेकाडे यांचा विरोध होता. मनोहर कुंभारे यांच्या विरोधात टेकाडे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. दरम्यान, त्यानंतर मनोहर कुंभारे यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष बनवण्यात आले.

कुंभारे यांना जिल्हाध्यक्ष बनवण्यात आल्यामुळे टेकाडे काही काळ अस्वस्थ होते. गेल्या आठ महिन्यांपासून ते सतत पक्षाच्या बैठकांना गैरहजर राहत असल्याची माहिती आहे. मात्र, आता पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कुंभारे यांनीच त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीपात्रात पुन्हा मळी मिश्रित पाणी सोडण्याचा प्रकार समोर

Narali Bhat Recipe: या नारळी पौर्णिमेला नक्की बनवा झटपट टेस्टी नारळी भात रेसिपी

Akola : अकोला पोलिसात खळबळ; कारवाई टाळण्यासाठी मागितली खंडणी, पोलिसांसह सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल

Sanjay Shirsat : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं वक्तव्य चर्चेत

Pune Crime : कॅफेमधील 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या

SCROLL FOR NEXT