Sharad Pawar-Shinde Group Yuti saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेंविरोधात पवार-शिंदे एकत्र; स्थानिक निवडणुकीसाठी नवं समीकरण, राजकारणात नवा सोलापूर पॅटर्न

Sharad Pawar-Shinde Group Yuti: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युतीचा नवा सोलापूर पॅटर्न समोर आलाय. पवारांच्या राष्ट्रवादीने चक्कं ठाकरेंविरोधात शिंदेंसोबत युती केलीय.या नव्या युतीच्या सोलापूर पॅटर्नवरचा, हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • सोलापूरमध्ये पवार-शिंदे एकत्र

  • महायुती आणि मविआ एकत्र लढणार

  • धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांनी नवीन सोलापूर पॅटर्न तयार झालाय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला रंग येण्यास सुरुवात झालीय. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र महायुती आणि मविआत फूट पडलीय. कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीत ठाकरेसेनेला रोखण्यासाठी मित्रपक्ष असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदेसेनेसोबत युती केलीय. तर या युतीची पायाभरणी केलीय पवारांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मात्र शिंदेसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा नेमका काय फॉर्म्युला ठरलाय? पाहूयात.

कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या 20 जागांपैकी 10 जागांवर शिंदेसेना तर 10 जागांवर पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार देण्यात येणार आहेत. मात्र नगराध्यक्षपद हे शिंदेसेनेला सोडण्यात आलंय. खरंतर कुर्डुवाडी नगरपरिषदेवर ठाकरेसेनेच्या धनंजय डिकोळे यांचं वर्चस्व आहे. मात्र आता हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या ठाकरेसेनेचे कट्टर विरोधक शिंदेसेनेसोबत युतीचा निर्णय घेतलाय.

सिंधुदुर्गमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक शिंदेसेना आणि ठाकरेसेना एकत्र येत असल्याची चर्चा रंगलीय. दुसरीकडे पुणे आणि बीड जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. तर रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिंदेसेनेला वगळून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येत आहेत. त्यामुळे सोयीनुसार तत्वांची भाषा करणारे अनेकजण एकमेकांच्या गळ्यात गळे घालून स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेची उब घेण्यासाठी सरसावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election: लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची अलीनगरमधून दमदार आघाडी|VIDEO

Pune Accident : आईच्या मैत्रिणीसोबत देवदर्शनाला गेली, वाटेतच काळाने घातला घाला; पुण्यातील अपघातात ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

5 & 7 Star Hotels : 5 आणि 7 स्टार हॅाटेलसध्ये असतो हा फरक, ९९% लोकांना अजूनही नाही माहिती

Maharashtra Live News Update: बिहारमधील विजयानंतर नाशिकमध्ये भाजपचा जल्लोष

Bihar Election Result: ...तर महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं, बिहार निकालावरून अंबादास दानवेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT