Supriya Sule news  Saam Tv
महाराष्ट्र

Supriya Sule: यापुढे पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Supriya Sule Big Statement: सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले. यापुढे पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

Priya More

Summary -

  • सुप्रिया सुळे यांचं मोठं राजकीय विधान

  • पवार कुटुंबाविरोधात निवडणूक न लढवण्याचा निर्णय

  • दुसरा मतदारसंघ शोधेल असं त्या म्हणाल्या

  • सुनेत्रा पवारांनी देखील दिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले. 'यापुढे मी पवारांविरोधात निवडणूक लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन', असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सप्रिया सुळे यांनी आज विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये झालेल्या घडामोडींवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे विधान केले. त्यांनी केलेल्या मोठ्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

पवारांविरोधात मी लढणार नाही असा निर्धार सुप्रिया सुळेंनी केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी नातवंड आहेत पवार आडनावाची त्यांच्याविरोधात मी कधीही इलेक्शन लढणार नाही. हेही इलेक्शन मी लढले नव्हते. याही इलेक्शनला खूपसा इतिहास आहे. हे सांगणं मला आज गरजेचे वाटत नाही. मागच्या वेळी देखील माझी तयारी -इच्छा बिलकुल नव्हती आणि इथून पुढेही नसणार आहे.

तसंच, 'मी पवारांच्या कुटुंबातल्या बाई आणि आबांच्या कुठल्याही कुटुंबातल्या मी पवार का म्हणते नाही तर कुठले बाहेरचे पवार आणतील आणि म्हणतील लढू नका. कारण ही लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे. पण बाई-आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्याविरोधात सुप्रिया सुळे निवडणूक लढणार नाही. दुसरा मतदारसंघ मी बघेल. मला देशाची सेवा करायची आहे.', असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले.

तर सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 'मी राजकारणात सांगत आले आहे की कुटुंब आमचं नेहमीच वेगळे असणार आहे आणि राजकारण वेगळं असणार आहे. सुप्रियाताईंनी चांगली गोष्ट सांगितली आहे. त्यांचे वक्तव्य चांगले आहे आणि आमच्या कुटुंबियांची देखील तिच इच्छा आहे.', असे सुनेत्रा पवारांनी स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT