Chhagan Bhujbal  saam tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव फायनल, पण अटीमुळं निर्माण झाली अडचण?

Rajya Sabha Nomination: राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी वरिष्ठ नेत्याचे नाव निश्चित करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांचे नाव जळपास फायनल झाले आहे. पण केंद्रात जाण्यापूर्वी भुजबळांनी एक अट घातली.

Priya More
  • राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित

  • राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून त्यांच्या नावाला प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा

  • केंद्रात जाण्यापूर्वी समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे, अशी अट छगन भुजबळ यांनी ठेवली

  • या अटीमुळे भाजप आणि महायुतीतील वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. त्यासाठी छगन भुजबळही सकारात्मक असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली. मात्र असं असतानाही छगन भुजबळांनी ठेवलेल्या अटींमुळे अडचण कायम आहे. 'मी राज्यसभेवर गेलो तर समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्री करावं.', अशी अट छगन भुजबळांनी घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात भाजपसोबत बैठकही झाली आहे. मात्र अद्यापही भाजप नेतृत्त्वाचा निर्णय प्रलंबित आहे.

राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी मंत्री छगन भुजबळांना संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या रिक्त झालेल्या जागेवर पक्षाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला संधी मिळावी असे मत व्यक्त केले. त्यामुळे या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची सुत्रे हाती घेतली. त्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेवर छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. या जागेसाठी येत्या १८ जूनला मतदान होणार आहे.

छगन भुजबळ यांना केंद्रात पाठवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास निश्चित झाले आहे पण त्यांनी केंद्रात जाण्यापूर्वी एक अट टाकली आहे. त्या अटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत. मी जर केंद्रात गेलो तर समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्या अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. त्यांच्या या अटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर खलबतं आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता समीर भुजबळ यांची मंत्रिपदावर वर्णी लागते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजित दिपके आजपासून आमरण उपोषण करणार

Dharashiv : तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट, धाराशिवमधील धक्कादायक घटना; फोटो पाहून अंगावर काटा येईल

Gold Rate Today : आज सोन्याचे दर घसरले की वाढले? जाणून घ्या २४ आणि २२ कॅरेटचे आजचे भाव

Sprout Benefits: उकडलेले कडधान्य कधी खाल्ले आहे का? चमत्कारी फायदे वाचाल तर आताच खायला सुरूवात कराल

Famous Actress Death : ऑस्कर विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT