Nawab Malik In NCP Meeting  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानपरिषदेसाठी NCPची हायव्होल्टेज बैठक; मलिकांच्या एंट्रीनं महायुतीची कोंडी?

Nawab Malik In NCP Meeting : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची बैठक 'देवगिरी' बंगल्यावर पार पडली. ही बैठक विधानपरिषदेसाठी जरी झाली असली यात विधानसभेसाठी किती जागा घ्याचा यावरह चर्चा झाली. परंतु या सर्वात जास्त चर्चा नवाब मलिक यांच्या नावाची झाली.

Tanmay Tillu

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी' बैठक पार पडली या बैठकीला आमदार नवाब मलिकांनीही हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची भेट घेतली होती. त्यानंतर ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले होते. यावर भाजपनं आक्षेप घेत हात झटकले होते. आता पुन्हा मलिक अजित पवार गटात सामील झाल्यामुळे भाजप काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीआधी महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागावाटपात तडजोड करावी लागली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्वत: अजित पवारांनीच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं 85 जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केलीये.

यासाठी पार पडलेल्या बैठकीत नवाब मलिकही उपस्थित होते. ज्या नवाब मलिकांना देवेंद्र फडणवीसांनी विरोध केला होता, तो विरोध झुगारून मलिकांना अजित दादांनी पक्षात घेतलं का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीये. याबाबत अजित पवारांना विचारलं असता ते काय म्हणाले ऐका.

लोकसभेत तोंड पोळलेल्या अजित पवारांनी विधानसभेआधी सावध खेळी करत 85 जागांसाठी फिल्डिंग लावलीय. दुसरीकडे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झालीये ती नवाब मलिकांच्या उपस्थितीनं..कारम भाजपचा मलिकांना विरोध आहे. विधान परिषदेसाठी मतांच्या गणितांची जुळवाजूळव करायची असल्यानं मलिकांना चुचकारलं जातंय का? असा सवाल उपस्थित झालायं. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर निशाणा साधलायं.

भाजपनं आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप केले होते. त्यानंतर इतके दिवस तटस्थ राहिलेले मलिक अजितदादांच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांचा महायुतीला पाठिंबा का? आणि असल्यास भाजपला ते मान्य आहे का यावर विरोधक आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT