Rohit Pawar's Allegations Against Sanjay Shirsat x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नवी मुंबईत ५ हजार कोटींचा घोटाळा? शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप; पुरावेही समोर

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये पाच हजार कोटी रुपयांचा जमीन घोटाळा झाल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. या घोटाळा प्रकरणी रोहित पवारांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले आहेत.

Yash Shirke

  • नवी मुंबईत तब्बल ५ हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप रोहित पवारांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर केला आहे.

  • पवारांनी १२ हजार पानांची कागदपत्रे आणि पुरावे घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

  • या गंभीर आरोपांमुळे राजकारणात खळबळ उडाली असून शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

विकास मिरगणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Rohit Pawar's Allegations Against Sanjay Shirsat : नवी मुंबईत तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घोटाळ्याचा आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे.

नवी मुंबईत ५ हजार कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. हा घोटाळा ५० हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा दावा देखील पवार यांनी केला आहे. त्यांनी बारा हजार पानांची कागदपत्रे आणि घोटाळ्यासंबंधित पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

रोहित पवार यांनी नवी मुंबईतील जमीन घोटाळा प्रकरणात सिडकोचे माजी अध्यक्ष आणि आमदार संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संजय शिरसाट यांनी अध्यक्ष असताना नवी मुंबईतील १५० एकर जमीन बिवलकर यांना दिली होती. या व्यवहारात ५ हजार कोटींचा भष्ट्राचार झाल्याचे पवारांनी म्हटले आहे.

संजय शिरसाट यांनी नवी मुंबईत १५० एकर जमीन बिवलकर यांना दिली होती. त्यातून ५ हजार कोटींचा भष्ट्राचार झाला आहे. या पैशांमधून शिरसाट यांनी हॉटेल्स आणि एमआयडीसीमधील भूखंड खरेदी केले आहेत. या व्यवहारातून स्थानिक भूमिपुत्रांचे मोठे नुकसान झाले आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. या गंभीर आरोपांमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT