Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार? बडा नेता भाजपच्या वाटेवर, पक्षांतरावर नेत्याचं मोठं वक्तव्य

Maharashtra Political News : नाशिकमधील ठाकरे गटाच्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. या पक्ष प्रवेशादरम्यान काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Yash Shirke
  • नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत

  • या पक्षप्रवेशादरम्यान काँग्रेसचा बडा नेताही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • सुरु असलेल्या चर्चांवर काँग्रेसच्या नेत्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Maharashtra : नाशिकमध्ये ठाकरे गटातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसचे मोठे नेते देखील भाजपच्या मार्गावर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नाशिकमध्ये काँग्रेसला धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे राहुल दिवे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. सुरु असलेल्या चर्चांवर राहुल दिवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

'मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही. काँग्रेसमध्ये मी नाराज नाही, आगामी महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेसकडूनच लढणार आहे. निवडणूकीच्या उद्धेशाने तशी तयारी सुरु आहे', अशी माहिती राहुल दिवे यांनी दिली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा या अफवा असल्याचे स्पष्टीकरण राहुल दिवे यांनी दिले आहे.

'माझ्या नावाची चर्चा सुरु असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितले. या सर्व अफवा आहेत. मागील २४ वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. सध्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये मी काम करत आहे. मी जिकडे आहे, तिकडे आनंदी आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारांशी मी बांधलेलो आहे. ज्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत, त्या सर्व अफवा आहेत', असे राहुल दिवे यांनी म्हटले आहे.

राहुल दिवे म्हणाले, 'विधानसभेत मला संधी मिळाली नाही. त्यामुळे मी नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण मी नाराजी आहे असे नाही. भाजपचे कार्यकर्ते जे बोलत आहेत, त्या गोष्टीचे मी खंडन करतो. मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. भाजपमध्ये येण्याच्या ऑफर मला मिळाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडूनही मला निरोप मिळाले आहेत. पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला आहे.'

रविवारी सुनील बागुल, मामा राजवाडे, गुलाब भोये यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. तेव्हा राहुल दिवे यांचाही पक्षप्रवेश होणार असल्याची शक्याता आहे. आणखी काही नेते भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत असे वक्तव्य भाजपचे नाशिक जिल्ह्याचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केले होते. त्यावरुन राहुल दिवे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT