
Dhananjay Munde News : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर खंडणीचा आरोप करण्यात आला. याच प्रकरणावरुन संतोष देशमुख यांचा खून झाल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. ४ मार्च २०२५ रोजी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला होता. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांच्याकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली.
आता धनंजय मुंडे यांचे पुनर्वसन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. 'कृषी घोटाळ्यातील आरोपातून त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. आता दुसऱ्या प्रकरणात चौकशी सुरु असून त्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ', असे महत्त्वाचे विधान अजित पवार यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
न्यायालयाने धनजंय मुंडे यांना एका प्रकरणामध्ये क्लीन चिट दिली आहे. बदनामी झाली ते झालीच पण पोलीस त्या प्रकरणावर कारवाई करत आहेत. यातून त्यांना जो मनस्ताप सहन करावा लागला ते भरुन काढता येऊ शकत नाही. कृषीबद्दल जे आरोप झाले ते मी म्हणत नाही, ज्यांनी आरोप केले, त्यांना दंड सुनावला आहे. आपल्याकडे न्यायालय सर्वोच्च व्यवस्था आहे. दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरु आहे, ती झाल्यानंतर वस्तूस्थिती पुढे येईल, ती पुढे आली की त्यात जर त्यांचा दुरान्वये संबंध नसेल, तर आम्ही त्यांना संधी देऊ, असे अजित पवार म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत आता पक्ष आणि महायुती काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून त्यांची हत्या झाल्याचे म्हटले जात होता. माजी मंत्री धनंजय देशमुख यांचा जवळचा सहकारी वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणामुळे झालेल्या राजकीय दबावामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता, असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.