Who is Sunita Gawande appointed as Maharashtra Women Congress president? saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या नेतृत्वात बदल! विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर मोठी उलटफेर, 'या' नेत्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Who is Sunita Gawande: महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी सुनीता गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोण आहेत सुनीता गावंडे? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली नवी जबाबदारी.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी सुनीता गावंडे यांची नियुक्ती

  • सुनीता गावंडे यांच्याकडे महाराष्ट्र महिला काँग्रेसची महत्त्वाची जबाबदारी

  • सुनीता गावंडे यांचा नागपूर जिल्हा परिषदेतील राजकीय प्रवास

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिलाय. निवडणुका होताच काँग्रेसमध्ये मोठी उलटफेर झालीय. नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला. त्यानंतर नागपूरमधील एका महिला नेत्याकडे मोठी जबाबदारी महत्त्वाची जबाबदारी सोपवलीय. महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी सुनीता गावंडे यांची नियुक्ती करण्यात आलीय.

सुनीता गावंडे यांच्या या नियुक्तीमुळे राज्यातील महिला काँग्रेसच्या संघटनात्मक नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. सुनीता गावंडे या सध्या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिव म्हणून कार्यरत आहेत.सुनीता गावंडे यांना संघटनात्मक आणि राजकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी २००२ ते २००५ या कालावधीत नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.

त्यानंतर २००५ ते २०१६ या तब्बल ११ वर्षांच्या काळात त्यांनी नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर काम केलंय. संघटनात्मक कामाचा अनुभव आणि नेतृत्वक्षमता लक्षात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान सुनीता गावंडे या उच्चशिक्षित असून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात महिला काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.आता राज्यभरातील महिला काँग्रेसची संघटनात्मक बांधणी, महिला कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : दिवाळीत फराळावर ताव मारताना सावधान! ॲसिडिटी टाळण्यासाठी करा 'हे' ५ घरगुती उपाय

फटाके फोडल्यानंतर डोळ्यांत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, नाहीतर कायमची जाईल दृष्टी

Maharashtra News Live Update : आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व आमदारांची बैठक

Ahilyanagar Bank Election Result: अहमदनगर जिल्हा बँकेवर विखे-थोरात गटाचं वर्चस्व, अध्यक्षपद कोणाकडे जाणार? निकाल लागताच सुजय विखेंचं सूचक संकेत

रात्री मित्रासोबत फोनवर बोलणं, सकाळी खोलीत २० वर्षीय मुलीचा आढळला मृतदेह; शासकीय वसतिगृहात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT