Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मनसेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जोरदार धक्का

Maharashtra Political News : कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागली आहे. मनसेच्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Yash Shirke

  • कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला मोठा धक्का.

  • अनेक माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश.

  • एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार.

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोबिंवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागली आहे. माजी नगरसेविकांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे, विद्यार्थी सेनेचे सूरज मराठे, मनसेचे उपशहर प्रमुख किशोर कोशिंबकर, विभाग सचिव संजय तावडे, उपविभाग प्रमुख केतन खानविलकर, शाखाध्यक्ष सुधीर थोरात यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे येथील बंगल्यावर पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले. मनसेच्या कल्याण-डोबिंवलीमधील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मनसेला खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे व्यतिरिक्त ठाणे महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व टीडीसी बँकेचे माजी संचालक बाबाजी पाटील यांनी देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

कोकणातही मनसेला धक्का

मनसेला कोकणातही धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे. मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यांना सुरुवातीला शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याची ऑफर मिळाली होती. आता वैभव खेडेकर शिंदे गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. निवडणुकीपूर्वी मनसेला लागोपाठ धक्के बसत असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीत मोठा बदल; अशी असणार मुंबई-पुण्याची वाहतूक व्यवस्था

Maharashtra Live News Update: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मित्रावर फसवणुकीचा गुन्हा

Maratha Aarakshan: मराठ्यांना आरक्षण मिळणार? आशिष शेलार यांनी स्पष्ट केली भाजपची भूमिका! म्हणाले...,VIDEO

Rohini Khadse : रोहिणी खडसेही अडचणीत? खेवलकरच्या मोबाइलचा व्हॉट्सअ‍ॅप डेटा डिलिट, पोलिसांना वेगळाच संशय

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! २ दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT