Manoj Jarange Patil On devendra fadnavis Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: फडणवीसांना आईवरून शिवीगाळ, चित्रा वाघ यांच्या आरोपावर मनोज जरांगे संतापले

Manoj Jarange Patil On devendra fadnavis: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी येत्या २७ ऑगस्टला मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघणार आहेत. यासंदर्भात त्यांनी मांजरसुंबा गावामध्ये काल सभा घेतली होती. या सभेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

Priya More

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. २७ ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून मराठा आरक्षासाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. २९ ऑग्सटला गणपती घेऊन मुंबईत प्रवेश करणार असल्याचा निर्धार त्यांनी केला. मांजरसुंबा गावात घेतलेल्या सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांना आईवरून शिवीगाळ केला असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. त्यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे संतापले.

देवेंद्र फडणवीस यांना आईवरून शिवी दिली असल्याची टीका मनोज जरांगे यांच्यावर होत आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, 'मी कुणालाही शिवी दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांना शिवी दिली नाही. त्यांच्या आईबद्दल मी काही बोललो नाही. तसे असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. मी बोललोच नाही तरी देखील मी शब्द मागे घेतो. आम्हाला आरक्षण द्या. कारण आमच्याही आई- बहिणी दिवसरात्र काबाड कष्ट करतात. त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागले आहेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्याही आईला तोला अन् आईच्या लेकराला आरक्षण द्या.'

कालच्या सभेमध्ये फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना जरांगे म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी तसे काही बोललोच नाही. पण ओघाने बोललो असेल तर ते शब्द मागे घेतो. मोठ्या मनाने मी शब्द मागे घतो. त्यात इतके काही नाही. आम्ही काही आडमुठे नाही. पण स्वत:च्या आईमध्ये दुसऱ्यालाही तोला. आमच्या आई तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या तेही पाहा. त्यावेळी आमच्याच पोलिसांना मारलं असे म्हणाले होते. त्यावेळी आमची आई नव्हती का? कोण प्रवक्ता शेण खाते बिनकामाचा... त्यावेळी आमची आई दिसली नाही का?', असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांनी यावेळी टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिलं. 'आमची आई रक्ताच्या थारोळ्यात गेली तेव्हा तू कुठे मेली होतीस? तीन चार वर्षांच्या मुली रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा झोपली होती का, तेव्हा आई दिसली नाही का? तेव्हा जात जागी झाली नाही का? कुणाच्याही नादी लाग. माझ्या नादी लागू नको. तू बाई आहे, तर आमच्याकडेही बाया आहेत. तू शिकवू नको. आमच्या आया बहिणीवर ३०७ केले, तुमच्यावर ३०७ दाखल केला तर. आमच्या आईवर हल्ला झाला तेव्हा का नाही टाकलं सोशल मीडियावर? आरक्षण द्यायचं जीवार आलं आहे म्हणून फडणवीस यांच्या आईचा विषय पुढे केला.', असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

SCROLL FOR NEXT