Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : कृषीमंत्र्यांचा नवा व्हिडीओ व्हायरल, जितेंद्र आव्हाडांचा खुलासा; रमीच्या डावाबाबत मोठा गौप्यस्फोट?

Jitendra Awhad X Post : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी प्रकरणामुळे चर्चेत आहेत. कोकाटे यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटेंचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Yash Shirke

Maharashtra Political News : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातला व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्री रमी खेळत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले होते. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. रमी प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधिमंडळाच्या सभागृहामधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर सर्वबाजूंनी टीका झाली. या रमी खेळण्यावरुन विरोधकांनी कोकाटेंना धारेवर धरले. त्यानंतर 'मी रमी खेळत नव्हतो. मी मोबाईलवर युट्यूब सुरु केले होते. तेव्हा व्हिडीओच्याआधी रमीची जाहिरात आली होती. ती जाहिरात मी स्कीप करत होतो. जाहिरातीला तीन-चार सेकंद जास्तीचा वेळ गेला. जाहिरात स्कीप करताना व्हिडीओ काढण्यात आला', असे स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिले होते.

कृषीमंत्री कोकाटे यांच्या स्पष्टीकरणानंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कृषीमंत्र्यांचे आणखी काही व्हिडीओ एक्स या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात ऑनलाईन जुगार, रमी खेळत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी माणिकराव कोकाटेंवर सडकून टीका केली आहे.

'एका बाजूला विधिमंडळाचे काम सुरु आहे. प्रश्न-उत्तरांचा तास सुरु आहे, दुसऱ्या बाजूला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत आहेत. त्यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मी जंगली रमी खेळत नव्हतो, जाहिरात बघत होतो, असे कोकाटे यांनी सांगितले होते. पण आता मी दोन नवे व्हिडीओ देतोय. हे व्हिडीओ नीट बघा. कुठला पत्ता, कुठे आणि कसा हलवला आहे, हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. कृषीमंत्री ऑनलाईन जुगाराचे पत्ते त्यांच्या बोटाने सरकावत आहेत. आणखी पुरावे हवे असतील सांगा, पाहिजे तेवढे पुरावे देतो', असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime : रेल्वेतून सोने- चांदी तस्करीचा डाव फसला; ३ कोटी रुपयांचे दागिने जप्त, एकजण ताब्यात

Loni Dosa: नाश्त्याला बनवा मऊ, जाळीदार लोणी डोसा; मिनिटांत डिश होईल फस्त

Bachhu Kadu: EVM चे रोप कोणी आणलं? आता भाजपने ते वटवृक्ष बनवलं- बच्चू कडू |VIDEO

Maharashtra Live News Update: चोपड्यात पोलिसांची मोठी कारवाई, आठ किलो गांजा जप्त

Konkan Politics: अखेर वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश, तीनवेळा हुकला होता मुर्हूत

SCROLL FOR NEXT