पुण्यात मनसेला मोठा राजकीय धक्का बसलाय.
मनसेचे माजी राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.
काँग्रेस पक्षाने मनसेमधील दिग्गज नेत्याला आपल्या पक्षात घेत राज ठाकरेंना जोरदार धक्का दिलाय. पुण्यातील नेतृत्व राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी संभाळलेल्या रणजित शिरोळे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. राहुल गांधींच्या नेतृत्वातील झंझावात अधिक लोकाभिमुख व्हावा यासाठी शिरोळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
दरम्यान शिरोळे कुटुंबाचे अनेक वर्षाचे काँग्रेससोबत ऋणानुबंध आहेत. त्यासोबत आम आदमी पक्षाचे सहकारीही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ज्या नेत्यांना व्हिजन आहे, अजेंडा आहे ते आगामी काळात पक्षात प्रवेश करतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
टिळक भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, रणजित शिरोळे यांचे पक्षात स्वागत करतो. त्यांच्या कुटुंबाचे आणि काँग्रेसचे ऋणानुबंध फार जुने आहेत. काँग्रेस विचारांचा आणि संस्कृतीचा वारसा शिरोळे यांना लाभलाय. पुण्यातील मूळ शहरात ज्यांच्या सात पिढ्या राहिल्या आहेत. पुण्याच्या जडणघडणीत त्यांच्या कुटुंबाचे योगदान होते. त्यांचे वडील काँग्रेसमधूनच नगसेवक होत स्थायी समिती अध्यक्ष झाले होते, असं सपकाळ म्हणालेत.
रणजित शिरोळे हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षात होते. त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. त्यांनी २००९ साली मनसेकडून लोकसभेची निवडणूकही लढवली होती. त्यांचे वडील श्रीकांत शिरोळे यांनी पुण्यात अनेक वर्ष स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांचे आजोबा भाऊसाहेब शिरोळे हे पुण्यातील काँग्रेसचे नेते होते.
पुण्यात ते बिनविरोध महापौर झाले होते. त्यांनी आमदार म्हणून विधानसभेत काम केले होते. मात्र रणजित शिरोळे हे राज ठाकरेंच्या जवळचे होते. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीय होते. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रणजित शिरोळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.