Congress leader Nana Patole addressing a press conference amid rising political buzz over the Mumbai Mayor election. saamtv
महाराष्ट्र

राजकीय भूकंप होणार? पुढील ८ दिवसांत उलटफेर होणार, महापौरपदाच्या वादादरम्यान बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics: मुंबईच्या महापौरपदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. येत्या आठ दिवसांत महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय.

Bharat Jadhav

  • मुंबई महापौरपदावरून सत्ताधारी गटात रस्सीखेच

  • नाना पटोले यांचा पुढील ८ दिवसांत मोठ्या उलटफेराचा दावा

  • ‘हॉटेल पॉलिटिक्स’मुळे राजकीय चर्चांना उधाण

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून अनेक घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. शिंदे यांनी भाजपकडे मुंबईत अडीच वर्षे महापौरपदाचा प्रस्ताव ठेवल्याचं बोललं जातंय. याचदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजकारणात भूकंप घडणारा दावा केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘येत्या आठ दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे उलटफेर होतील’, असं नाना पटोले म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुंबईत सुरू असलेल्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “आम्ही मागेच म्हटलं होत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करेल. अजून खूप घडामोडी घडतील.

सध्या मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. मुंबईत भाजपाचाच महापौर होईल आणि त्यामध्ये कोणाचंही ऐकलं जाणार नाही असे आदेश दिल्लीवरून मुख्यमंत्री फडणवीसांना दिले जात आहेत. दरम्यान अशा बातम्या चालू असून त्या आपण पाहत आहोत, पण अजून मोठे गेम होणार आहेत”, असे नाना पटोले म्हणालेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या आठ दिवसांत खूप मोठे उलटफेर होणार. महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसचीच सत्ता पाहिजे असं वातावरण आहे. फक्त यांनी बॅलेटवर मतदान घ्यावं. मग लोक बरोबर करतील, असेही असं नाना पटोले म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजप करेल आणि केलाय. पिंपरी-चिंचवड, पुणे या ठिकाणी अजित पवारांची मालकी होती. आता ही मालकी कुणाकडे गेली? तिकडे नवी मुंबई, ठाण्यातही तसेच आहे. त्यामुळे भाजपा काय करणार होतं? हे मी पहिलंच सांगितलं होतं. त्यामुळे अजून आणखी खेळ समोर आहे, काही दिवस थांबा असं पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT