साहेब, युती तोडा! भाजप कार्यकर्त्यांचा भररस्त्यात राडा ; ZPचा फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

Sambhajinagar Politics: जिल्हा परिषदेच्या जागावाटपाच्या सूत्राच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय नाट्य सुरू झाले.
Sambhajinagar Politics:
BJP workers protest on the streets in Sambhajinagar after the BJP–Shiv Sena alliance announcement for ZP elections.saam tv
Published On
Summary
  • जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप-शिंदेसेनेची युती जाहीर

  • जागावाटपाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांचा रस्त्यावर राडा

  • ‘युती तोडा’ अशी जोरदार घोषणा देत नाराजी व्यक्त

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी युती आणि आघाड्यांची बोलणी सुरूय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची अखेर युती झाली. शिवसेना २५ तर भाजप २७ जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट तर भाजपकडून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली. मात्र या युतीच्या घोषणेनंतर संभाजीनगरमध्ये चांगलाच राडा झाला.

Sambhajinagar Politics:
Zilla Parishad Election: राजीनामा सत्र थांबता थांबेना! ऐन निवडणुकीत अजित पवारांना तिसरा मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्यासमोर हात जोडले, तसेच त्यांच्या गाड्याही अडवल्या. साहेब, युती तोडा, असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी युतीला थेट विरोध दर्शवला. संभाजीनगरमधील शिवसेना-भाजपची ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यात असेन. तर सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यातील ११ ठिकाणी युती न करता शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकांवेळी इच्छुकांचा जसा राडा झाला तसाच राडा आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या युतीच्या घोषणेनंतर झाला.

Sambhajinagar Politics:
Maharashtra Politics: मराठी महापौरच झाला पाहिजे, परप्रांतीय महापौर केला तर उग्र आंदोलन; कुणी दिला इशारा?

वैजापूर तालुक्यातील भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे थेट मंत्री अतुल सावे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्यांची गाडीही अडवली. त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ पाहायला मिळाला. अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात मंत्री अतुल सावे निघून गेले. वैजापूर तालुक्यातील ८ जागांपैकी केवळ ३ जागा भाजपला मिळालेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केलाय. अनेक वर्षे आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. मात्र ती जागा शिवसेनेला गेली आणि तिथं भाजप नेत्यांना शिव्या देणारा व्यक्ती उमेदवार असणार आहे. त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी काम करायचं का? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com