Maharashtra Politics: मराठी महापौरच झाला पाहिजे, परप्रांतीय महापौर केला तर उग्र आंदोलन; कुणी दिला इशारा?

Marathi Ekikaran Samiti Warn BJP : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालीय. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मिरा भाईंदरच्या पालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे असा थेट इशारा दिला आहे.
Marathi Ekikaran Samiti Warn BJP :
Marathi Ekikaran Samiti president Govardhan Deshmukh issues a warning over the mayor post in Mira-Bhayandar.saam tv
Published On
Summary
  • आम्ही मराठी महापौर पदासाठी ठाम आहोत.

  • मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही, गोवर्धन देशमुख यांचा इशारा

  • मीरा भाईंदरच्या पालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे

मनोज तांबे, साम प्रतिनिधी

महापौरपदाववरून मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये वातावरण तापलंय. जर मराठी माणसाऐवजी परप्रांतीय व्यक्तीला संधी दिली तर संयुक्त महाराष्ट्र दोन सारखं मोठं जन आंदोलन उभारलं जाईल. माजुरडेपणा करून अमराठी महापौर बसवला तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडेल, असा इशारा मराठी एकीकरण समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिलाय. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत हा इशारा दिलाय.

मुंबई महानगरपालिकाच्या निवडणूक प्रचारावेळी मराठी आणि अमराठी महापौरपदाचा मुद्दा गाजला होता. भाजप मुंबईच्या महापौरपदी अमराठी व्यक्तील बसवेल, असा आरोप ठाकरे सेना आणि मनसेकडून केला गेला. तर आम्ही हिंदू व्यक्तीला महापौरपदी बसवू ,असं प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आलं.

दरम्यान मुंबईच्या महापौरपदासाठी काढली जाणारी सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती दिलीय. मुंबई मनपात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, ओबीसी आणि जनरल प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे. याचदरम्यान मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी महापौरपदावरून भाजपला थेट इशारा दिलाय.

Marathi Ekikaran Samiti Warn BJP :
Zilla Parishad Election: राजीनामा सत्र थांबता थांबेना! ऐन निवडणुकीत अजित पवारांना तिसरा मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत उत्तर भारतीय व्यक्तीला महापौर बनवून असा दावा भाजप नेते, कृपाशंकर यादव यांनी केला होता. त्यामुळे मराठी एकीकरण समिती अध्यक्षांनी थेट इशारा देत उग्र आंदोलन होईल आणि संयुक्त महाराष्ट्र दोन असं आंदोलन करण्यात येईल, असं म्हटलंय.

महापौर पदावरून मुंबईत वादंग सुरू आहे. तेथे कोणाचा महापौर होणार याचा निकाल लागेलच, पण मुंबई शेजारी असलेल्या मीरा-भाईंदर शहरातही भाजपनं बहुमताने विजय मिळवला आहे. मात्र येथे परप्रांतीय व्यक्तीला महापौरपदी बसवयचा असा मनसुबा भाजपचा आहे. मात्र हे खपवून घेतलं जाणार नाही. जर आमच्या नाकावर टिच्चून कोणी माजुरडेपणा करत अमराठी व्यक्तीला महापौरपदी बसवलं, तर मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गोवर्धन देशमुख यांनी दिलाय.

Marathi Ekikaran Samiti Warn BJP :
Maharashtra Politics: भाजप-ठाकरे गटाची युती होणार? भाजपची शिवसेनेला नवी 'ऑफर', नेत्यांच्या गुप्त भेटी सुरू

मराठी एकीकरण समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख काय म्हणाले?

भाजपने जवळपास सर्वच महापालिकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. दरम्यान मुंबईमध्ये कोणाचा महापौर बसेल याचा निकाल लागलेच. पण मुंबई शेजारी असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपने ७०-७९जागा जिंकत बहुमत मिळवलंय. मात्र येथे प्रचारावेळी उत्तर भारतीय नेते कृपाशंकर यादव म्हणाले होते की, मीरा-भाईंदर महापालिकेत उत्तर भारतीय व्यक्तीला महापौर बनवू. त्यावेळीही आम्ही विरोध केला होता.

मुंबईच्या महापौरपदावरूनही वादंग माजलाय. मुंबईचा महापौर मराठी माणूस होईलच आणि मीरा भाईंदर येथेही मराठी व्यक्तीच महापौरपदावर बसेन. जर उगाच जाणूनबुजून अमराठी व्यक्तीला महपौर केले, तर गाठ मराठी माणसाशी आहे.

मराठी एकीकरण समितीने काढलेला मोर्चा मीरा-भाईंदरमधील नागरिकांनी पाहिलाय. जर कोणी उद्दामपणा केला आणि आमच्या नाकावर टिच्चून परप्रांतीय व्यक्तीला महापौर बनवलं तर या ठिकाणी उग्र आंदोलन होईल. संयुक्त महाराष्ट्र दोन म्हणून मोठा लढा उभारला जाईल. जर कोणी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही, यात माझा जीव गेला, किंवा गोळ्या झाडल्यात ते मी सहन करायला तयार आहे, असा इशारा गोवर्धन देशमुख यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com