आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जाणार?
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक का बोलावली?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटी बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये अनेक मोठ्या घडामोडी सातत्याने घडत आहेत. बैठकांचे सत्र चालून असतानाच महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षातून एक मोठी बातमी समोर आलीय. सत्तेत वाटेकरी असलेल्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार आता मुख्यमंत्री फडणवीसांची भेटीला जाणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलवल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत, त्यामुळे सरकारमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचं चित्र आहे.
आज बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, कमिटीचे सदस्य दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ धनंजय मुंडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
मुंबईतील कार्यकर्ते नाराज असल्याचे समोर आले होते, पार्थ पवारांनी झिशान सिद्दीकी आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदावर उमेश पाटील यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीमध्ये कमिटीला विचारात घेतले नसल्याचा आरोप नेत्यांनी केला. या नियुक्तांमध्ये फेरविचाराची शक्यताही वर्तवण्यात येत होती. पण पक्षाने स्पष्ट केलं आहे की या नियुक्त्या कायम राहणार आहेत.दोघेही पुढील सहा महिने काम करतील, त्यांच्या कामाचे मूल्यमापन करु मग पुढील निर्णय घेऊ अशा प्रकारची भूमिका पार्थ पवारांनी या बैठकीमध्ये मांडली.
मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पक्षाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला २० पेक्षा अधिक आमदार उपस्थित होते. या बैठकीत आमदारांनी आपल्या अडचणी आणि मनातील भावना वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडल्या. बैठकीदरम्यान पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्थानिक नेत्यांना फटका बसतोय. त्यांना वरील पातळीवर काय चालू याची माहिती मिळत नाही. आता या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या बैठकांची मालिका सुरूय. याच मालिकेतील एक महत्त्वाची बैठक देवगिरी निवासस्थानी पार पडली. यात अजित पवारांच्या मृत्यूसंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याशिवाय दिवाळीनंतर आता पक्षाचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
दरम्यान यावेळी सीआयडी चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर मांडावा अशा स्वरुपाची मागणी हे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार असल्याचीही माहिती समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादीतील घडामोडी या चर्चेमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे नेते शिंदे सेनेची तक्रारही फडणवीसांकडे करणार असल्याची माहितीही समोर आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.