शिंदेसेनेत फूट पडणार? शिंदेसेनेतील आणखी दोन शिंदे कोण?

Sanjay Raut Predicts Split in Eknath Shinde Shiv Sena: संजय राऊतांनी केलेल्या खळबळजनक दाव्याची... शिंदेसेनेत लवकरच फूट पडणार असल्याचा दावा राऊतांनी केलाय.. मात्र या फूटीला नेमकं जबाबदार कोण असेल? राऊतांनी नेमकं काय भाकित वर्तवलयं ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
SANJAY RAUT BIG CLAIM
SANJAY RAUT BIG CLAIMsaam tv
Published On: 

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेत लवकरच मोठी फूट पडणार असल्याचा दावा करत ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. 'शिंदेसेनेत काहीही आलबेल नसून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणेच शिंदेसेनाही लवकरच कोसळेल,' असं थेट विधानचं राऊतांनी केलं आहे. आमच्याकडे एकनाथ शिंदेंच्या रूपाने एकच शिंदे होता, पण आता शिंदेसेनेत तीन 'शिंदे' तयार झाले आहेत, असा टोलाही राऊतांनी लगावलाय...

राऊतांच्या या विधानामुळे दोन शिंदे भविष्यात शिंदेसेनेच्या फुटीला जबाबदार असतील का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे ठाकरेसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याआधी मंत्री उदय सामंत हे शिंदेसेना फोडणार असल्याचा दावा केला होता, तर दुसरीकडे एका माजी खासदाराला भाजपमधूनच ताकद दिली जात असल्याचंही बोललं जातंय. मात्र संजय राऊतांच्या शिंदेसेना फुटीच्या दाव्यावर भाजप आणि शिंदेसेनेने चोख प्रत्युत्तर दिलंय..

विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजप- शिंदेसेनेत दगाबाजीवरून चांगलंच राजकारण तापलं होतं... अशातच राऊतांनी शिंदेसेनेतील फुटीबद्दल दावा केलाय...मात्र राऊतांच्या या दाव्यात खरचं तथ्य आहे का? शिंदेसेनेत खरचं भूकंप होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.