sharad pawar Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: खानदेशात शरद पवारांना मोठा धक्का, जवळची व्यक्ती सोडणार साथ

NCP Sharad pawar Group: जळगावमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या निकटवर्तीयाने पक्षाची साथ सोडली. ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Priya More

Summary -

  • खानदेशात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • माजी सभापती अरुणभाई गुजराथी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

  • आगामी स्थानिक निवडणुकीपूर्वी जळगाव जिल्ह्यात अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे.

  • शरद पवार गटात गळती सुरू असून राजकीय अस्थिरतेमुळे चर्चांना उधाण आले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अशातच आता खानदेशातही शरद पवारांना मोठा हादरा बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटातील अनेक माजी मंत्री आणि माजी आमदारांनी पक्षाची साथ सोडली होती. त्यानंतर आता आणखी एक बडा नेता पक्षा सोडण्याच्या तयारीत आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी शरद पवारांची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडली होती. पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरूच आहे. पक्षाचे अनेक बडे नेते शरद पवारांची साथ सोडत आहे. अशातच आता विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी हे देखील शरद पवार गटाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. पण अद्याप पक्ष सोडण्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे सांगतानाच आपण राजकारणातून हळूहळू बाहेर पडणार असल्याचे अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट जोरदार तयारीला लागला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यभर दौरे करत बैठका घेत आहेत. ११ सप्टेंबरला शरद पवार गटाची जळगाव जिल्ह्यात महत्वाची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे जिल्ह्यातील अनेक बडे नेते उपस्थित होते. पण या बैठकीला अरुणभाई गुजराथी आले नव्हते त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. तेव्हापासूनच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. ते कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा देखील सुरू आहे. पण त्यांनी आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचे सांगितले.

अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले की, 'मी सर्व बैठकांमध्ये चांगल्या पद्धतीने उपस्थित राहायचो. काल मी उपस्थित नव्हतो ही वस्तुस्थिती आहे. त्यातून काही लोकांनी मी भाजप, अजितदादा गटात जाणार असल्याची चर्चा केली. मी आता हळहळू राजकारणातून निवृत्त होणार आहे. माझे वय ८५ वर्षे झाले आहे. मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही किंवा नियुक्तीने कोणतीही जागा मिळवायची नाही. मला शरद पवारांनी खूप मोठे केले. मी माझ्या नेत्याला कसं सोडणार, त्यांच्या बद्दलची कृतज्ञता कायम राहिल. माझ्याकडील कार्यकर्त्यांची फळी अजित पवार गटात जाण्याकडे कल आहे. त्या दृष्टीने त्यांना काही निर्णय घ्यायचे आहे. त्यांना आता जि.प, नगरपालिका, निवडणुका लढवायच्या आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांचा उत्तराई म्हणून त्यांचे काम मला करावे लागेल अशी माझी इच्छा आहे. कार्यकर्त्यांना मी सोडू शकत नाही, हे देखील सत्य आहे. या निवडणुकांनंतर मी स्वत: राजकारणापासून अलीप्त होऊन जाईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळ सीमाशुल्क मोठी कारवाई

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT