Sharad Pawar: निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी फडणविसांचा फोन, राधाकृष्णन यांचा भूतकाळ सांगत शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Political statement on Vice Presidential: शरद पवार यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाठिंबा मागितला असताना राधाकृष्णन यांच्या भूतकाळाचा उल्लेख करत पाठिंबा नाकारला.
Summary
  • शरद पवार यांनी फडणवीसांचा फोन नाकारून राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला नाही.

  • NCP ने सुदर्शन यांना उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली.

  • राधाकृष्णनचा भूतकाळ झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटकेशी संबंधित असल्याने विरोध नोंदवला.

  • मतसंख्या कमी असली तरी पवारांनी काळजीपूर्वक धोरण ठरवण्याचे ठाम मत व्यक्त केले.

पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आयोगावर निशाणा साधला. तसेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही वक्तव्य केले.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला काल फोन केला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, अशी त्यांनी विनंती केली. पण ते आमच्या विचाराचे नाहीत, असे मी त्यांना सांगितले, शरद पवार म्हणाले.

राधाकृष्णन राज्यपाल असताना झारखंडच्या मुख्यमंत्र्‍यांना अटक झाली होती. ते आमच्या विचाराचे नाहीत. उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात आमच्या बैठका झाल्या. त्यानंतर आम्ही काल सुदर्शन यांचा इंडिया आघाडीकडून फॉर्म भरला आहे. आमच्याकडे मतांची संख्या कमी आहे. पण आम्हाला चिंता नाही.

इंडिया आघाडीकडे मतांची संख्या जास्त आहे. पण आम्ही चौकटीच्या बाहेर जाणार नाही. आमची ताकद किती आहे, याबाबत आम्हाला माहिती आहे. आमच्याकडे मते कमी असले तरी आम्ही नुसते उद्योग करणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com