raj thackeray eknath shinde saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मनसेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का

Maharashtra Political News : अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडणार आहे. माजी नगरसेवक, शहराध्यक्ष, जिल्हा संघटकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पडणार मोठं खिंडार पडले आहे

  • माजी नगरसेवक, मनसे शहराध्यक्षांसह अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला आहे.

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : येत्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षामध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. मनसे निवडणुकीच्या दरम्यान ठाकरे गटासोबत युती करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चा सुरु असताना अंबरनाथमध्ये मनसेला खिंडार पडली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अंबरनाथ येथील मनसेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश झाला आहे. अंबरनाथ शहरातील मनसेचे शहराध्यक्ष, जिल्हासंघटक, शहर संघटक आणि माजी नगरसेविका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

ठाण्याच्या आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमादरम्यान मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर संघटक स्वप्नील बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे अंबरनाथमध्ये मनसेला सलग धक्के बसले आहेत.

हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा, मराठी भाषेचा मुद्दा लावून धरला. या निमित्ताने तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मराठीसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू युती कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दरम्यान मनसेची मोर्चेबांधणी सुरु असताना पक्षाला अंबरनाथमध्ये खिंडार पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

Cyclone Alert : पुन्हा आस्मानी संकट! 'मोंथा'नंतर आणखी एका चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रावर होणार परिणाम, IMD चा गंभीर इशारा

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

SCROLL FOR NEXT