Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बड्या नेत्याने सोडली साथ, हजारो पदाधिकाऱ्यांसह शिंदेसेनेत प्रवेश

Major Blow to Congress By Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. काँग्रेसच्या बड्या नेत्याने आज हजारो पदाधिकाऱ्यांसह शिंदेसेनेत प्रवेश केला.

Priya More
  • काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर साहेबराव कांबळे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

  • हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही साहेबराव कांबळे यांच्यासोबतकेला पक्षप्रवेश

  • विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई होती कारवाई

विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळून देखील ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेणाऱ्या नेत्यांवर काँग्रेसने कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. यवतमाळमधून साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी देण्यात आली होती. पण शेवटी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाने कारवाई करत निलंबन केले. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर साहेबराव कांबळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आज पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज धनुष्यबाण हाती घेतलं.

काँग्रेसचे यवतमाळ विधान परिषद निवडणूकतीतून माघार घेणारे साहेबराव कांबळे यांनी आज शिंदेसेनेत प्रवेश केला. काँग्रेस आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी साहेबराव कांबळे यांच्यासोबत धनुष्यबाण हाती घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल येथील नंदनवन या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले होते. साहेबराव कांबळे यांनीहजारो पदाधिकाऱ्यांसह शिंदेसेनेत प्रवेश केला.

साहेबराव कांबळे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. साहेबराव कांबळे यांनी शिंदेसेनेने पक्षात प्रवेश दिला. या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या किसनराव वानखेडेंच्या विरोधात त्यांना एक तगडा उमेदवार मिळाला असल्याची चर्चा होत आहे. या पक्ष प्रवेशामुळे यवतमाळमध्ये शिंदेसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसने पक्षाच्या २ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातून काँग्रेसने शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. तर यवतमाळ विधान परिषद मतदारसंघातून साहेबराव कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवत या दोघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात आले. पक्षासमोर अडचणी निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT