Growing tension within Mahayuti as signs of a rift between CM Fadnavis and DyCM Shinde emerge ahead of elections. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा कायम? निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत धुसफूस

Mahayuti Politics : मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमधील दुरावा कायम असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत धुसफूस सुरु आहे. शिंदेंची नाराजी कोणत्या वळणावर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

  • फडणवीस आणि शिंदेंमधील दुरावा पुन्हा चर्चेत आलाय.

  • निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत तणाव निर्माण झालाय.

  • महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच महायुतीतील अंतर्गत

शिंदेंच्या नाराजी नाट्यातला हा अजुन एक प्रसंग. फडणवीस आणि शिंदे एका कार्यक्रमात एकत्र आलेले. फडणवीस शिंदेंना जवळ बसण्यासाठी खुणावतात. मात्र शिंदे दोन खूर्च्या सोडून बसतात. या मधल्या दोन रिकाम्या खुर्च्यानी. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा पुन्हा एकदा समोर आणला.

गेटवे ऑफ इंडियावर झालेल्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच मंचावर आले. मात्र या भेटीतही दोघांमधील दुरावा स्पष्ट जाणवत होता. प्रत्यक्षात मात्र यावर बोलताना, शिंदेंसोबत न बोलण्यासारखं काही घडलं नाही, असं म्हणत फडणवीस यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील हा दुरावा यापूर्वीही कधीकधी समोर आला ते पाहूया.

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर फडणवीस, अजित पवार एकत्र महाराष्ट्रात परतले. शिंदे मात्र एकटेच आले. मुंबईत हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी फडणवीस आणि शिंदे एकत्र आले. मात्र दोघांनी एकमेकांकडे पाहणं टाळलंय. मुंबई पोलीस विभागाच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव असूनही शिंदे गैरहजर राहिले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच महायुतीतील अंतर्गत नाराजी वारंवार समोर येत होती. मात्र पालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलंय. नाराज असलेल्या एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांची थेट दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्यानंतर दोन्ही पक्षातला तणाव कायम आहे. त्यातच नगर पंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबरला आहेत.

तर महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना फडणवीस आणि शिंदे यांच्यातील ही दरी कमी होणार की वाढत जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. ऑपरेशन लोटसमधून भाजप शिंदे सेनेला धोपीपछाड देणार असल्याच्या चर्चा प्रत्यक्षात येणार का ? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : डॉ.गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच पार पडले अंत्यसंस्कार...

Homemade Apple Juice: घरच्या घरी फक्त २ मिनिटांत सफरचंदचा रस कसा बनवायचा?

आत्महत्यापूर्वी डॉ. गौरी कुठे होत्या? डान्स प्रॅक्टिसच्या काही तासानंतर का जीव दिला? वडिलांकडून मोठी माहिती उघड

PM Kisan Yojana: ५ दिवस झाले, अजूनही पीएम किसानचा हप्ता आला नाही? अशी करा तक्रार, लगेच येतील ₹२०००

Today Gold Rate : सोनं खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव; 24k, 22k च्या दरात मोठा बदल

SCROLL FOR NEXT