Mahayuti Tension: सन्मानजनक द्या नाहीतर तुमचा खेळ खल्लास; शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम

Shiv Sena Ultimatum To Bjp Over Seat Sharing: राजस्थानमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटलाय. जजागावाटपाबाबत शिंदे सेनेने भाजपला थेट अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे महायुती आघाडीतील तणाव वाढला आहे.
Shinde Sena leaders issue a strong seat-sharing warning to BJP as political tension rises in Mahayuti.
Shiv Sena Ultimatum To Bjp Over Seat Sharingsaamtv
Published On
Summary
  • शिंदे सेनेनं भाजपला जागावाटपाबाबत अल्टिमेटम दिलाय.

  • महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही महायुतीत तणाव वाढलाय.

  • महानगरपालिका आणि पंचायत निवडणुका जवळ आल्याने संघर्ष तीव्र होऊ लागलाय.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय. नेत्यांच्या फोडाफोडीवरून महायुतीमध्ये वाद उफाळून आलाय. त्याचवेळी आता शिंदे गट शिवसेनेनं भाजपला थेट अल्टीमेटम दिलाय. राजस्थानमध्येही आगामी महानगपालिका (Municipal Elections), पंचायत निवडणुका होणार आहेत. पण येथेही महाराष्ट्राप्रमाणे भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरून वाद उफाळून आलाय. शिंदे गटानं येथे भाजपला जागावाटपावरून अल्टीमेटम दिलाय.

Shinde Sena leaders issue a strong seat-sharing warning to BJP as political tension rises in Mahayuti.
Nagar Panchayat Elections: भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न' काय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याआधीच गुलाल कसा उधळतो?

जागावाटपात योग्य हिस्सा दिला नाही तर सर्व ठिकाणी उमेदवार उभे करू असा, इशारा शिवसेना शिंदे गटाने भाजपला दिलाय. कोटा धर्मांतरण प्रकरणावरही शिंदेंच्या शिवसेनेने भाजपवर तीव्र शब्दांत निशाणा साधलाय. एनडीएने बिहारमध्ये बहुमत मिळवले आहे.

पण राजस्थानमध्ये एनडीएमध्ये वाद पेटलाय. शिंदे गटाने भाजपला स्पष्ट शब्दात अल्टीमेटम दिलाय. पुढील महिन्यापर्यंत पक्षात एक लाख सक्रिय कार्यकर्ते तयार करणार असल्याचा दावाही राजस्थानातील शिवसेना शिंदे गटाने केलाय.

Shinde Sena leaders issue a strong seat-sharing warning to BJP as political tension rises in Mahayuti.
एकनाथ शिंदेंच्या सेनेचं काय होणार? शिंदेंच्या नाराजीची दखल कोण घेणार?

राजस्थानमध्ये शिंदे गटाने आपली सक्रियता मोठ्या प्रमाणात वाढवलीय. गेल्या वर्षी तीन आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिलाय. यानंतर आता प्रदेश अध्यक्ष प्रहलादसिंह आणि युवा प्रमुख सचिनसिंह गौड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हुंकार भरलाय. पक्ष संपूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याचं सांगितलंय.

शिवसेना एनडीएचा एक भाग असून केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपसोबत आघाडी आहे. त्यामुळे राजस्थानातील पंचायत-नगरपालिका निवडणुकीमध्ये जागावाटपात समाधानकारक जागा मिळाल्या नाही तर आम्ही स्वतंत्रपणेही लढू शकतो, असा इशारा शिवसेनेने दिलाय. दरम्यान राजस्थानमधील निवडणुकीसंदर्भात १५ डिसेंबरला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष अध्यक्ष एकनाथ शिंदे राजस्थानच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामध्ये निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com