एकनाथ शिंदेंच्या सेनेचं काय होणार? शिंदेंच्या नाराजीची दखल कोण घेणार?

Eknath Shinde Growing Discontent: वारंवार नाराज होणाऱ्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची भाजप काही मनधरणी करतांना दिसत नाही. भाजपच्या या ताठर भूमिकेनं शिंदेच्या शिवसेने पुढे आव्हान उभं राहिलंय का? मात्र हे आव्हान नेमकं कसं आहे?
Eknath Shinde and BJP leaders during a tense moment amid rising alliance friction.
Eknath Shinde and BJP leaders during a tense moment amid rising alliance friction.Saam Tv
Published On

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असा आरोप करत उद्धव ठाकरेंना सोडणारे शिंदे हे महायुतीत सध्या नाराज असल्याचं दिसतंय. ज्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी ठाकरेंना घरी बसवून शिवसेना आणि मुख्यमंत्री पद मिळवलं. ते मुख्यमंत्री पद सध्या हूकलं पण शिवसेना पक्ष हातात आल्यानंतरही गेल्या साडे तीन वर्षात एकनाथ शिंदेंना पक्षासाठी कुठलाही नवा विचार देता आलेला नाही. हे ही तितकंच खरंय. शिवसेना भवन आणि मातोश्री सोडून शिंदेंनी ठाकरेंकडून सगळंच घेतलं.

बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार म्हणत त्यांनी शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह, आमदार, खासदार, नगरसेवक, सत्ता आणि दसरा मेळावा सुद्धा शिंदेंनी घेतला मात्र पक्षबांधणीचा विचार आणि पक्षाचा विस्तार काही शिंदेंना भाजपानं करु दिला नाही हे ही तितकंच खरंय. आणि यामुळे शिंदेंची नाराजी वेळोवेळी दिसत असतांना भाजपनं मात्र त्याची फारशी दखल घेतली नाही.

लोकसभा निवडणूकीतील जागावाटपावरुन नाराज

विधानसभेत जागावाटपावरुन नाराजी

मुख्यमंत्रीपदावरून शपथविधीपर्यंत नाराजी

रायगड नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा

विरोधकांच्या भाजपप्रवेशावरुन शिंदे नाराज

गेल्या साडे तीन वर्षांतील शिंदेगटाची भाजप विरोधात असलेली नाराजीची ही मुख्य कारणं आहेत. मात्र आता तर भाजपनं शिंदेच्या शिलेदारांचीच नाकाबंदी केलीय. विधानसभेत ज्यांच्या विरोधात शिंदेंचे मंत्री आमदारांमध्ये जोरदार लढत झाली त्याच विरोधकांना भाजपन पक्षप्रवेश देत शिंदेगटातील नेत्यांची घेरांबदी केल्याची चर्चा रंगलीय. कॅबिनेटवर बहिष्कार टाकूनही फडणवीसांनी पक्षप्रवेशाला स्थगिती न दिल्यानं नाराज शिंदेंनी थेट दिल्लीचा दरवाजा ठोठावला पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील भाजपच्या नेत्यांनाच अभय दिलं आणि शिंदेंच्या नाराजीत भर पडल्याचं दिसलं.

बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणत शिंदेगटानं शिवसेना पक्षासह निवडणूकांमध्ये भाजपच्या साथीनं जोरदार यश मिळवलं. पण ज्या ज्या नेत्यांना शिंदेंनी सोबत घेतलं होतं त्या सगळ्या नेत्यांच्या मागे लागलेल्या ईडी आणि सीबीआयच्या चौकशांमुळेच हे नेते भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यात प्रताप सरनाईक, भावना गवळी, राहुल कनाल, रविंद्र वायकर, राजन साळवी यांनी तपास यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी शिंदेंची साथ दिली असं अनेकदा विरोधकांनी म्हटलंय. आणि असं जर असेल तर त्याच शिलेदारांची भाजपनं आता कोंडी केलीये.

शिंदेंनी ज्यावेळी शिवसेनेत बंड केलं तेव्हा पन्नास खोके एकदम ओके म्हणत विरोधकांनी शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांना ५० -५० कोटी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे पैसे, चौकश्या आणि सत्तेसाठी शिंदेसोबत नेते आले पण शिवसेनेचं काय? कारण एकनाथ शिंदे पक्षप्रमुख झाल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात शिंदेंच्या शिवसेनेनं एकही ठोस विचार दिला नाही ना ही आंदोलन. विचारांचे सोनं लुटणाऱ्या दसरा मेळाव्यात देखिल उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रतित्युतर ं याखेरिज नवा विचार काही ऐकालया मिळाला नाही त्यामुळे भविष्यात शिवसेनेसारख्या आक्रमक आणि भल्या मोठ्या संघटनेचं शिवधनुष्य शिंदे कसं पेलवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com