Mla Baburao Kadam Vs Kohalikar Atul Save saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत महायुद्ध? भाजपनं दाखवला २३७ चा आकडा; नंतर शिंदे गटाच्या आमदाराने अतुल सावेंना खडेबोल सुनावले

Mla Baburao Kadam Vs Kohalikar Atul Save: मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यात कलगीतुरा रंगलाय. महायुतीत बाहेर जावं, या सावेंच्या इशाऱ्यावर कदमांनी सणसणीत उत्तर दिलंय.

Bharat Jadhav

महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचं कारणं ठरलेला मुद्द्यावरून महायुतीतही महायुद्ध घडणार असल्याचं संकेत मिळत आहेत. अर्थमंत्री अजित पवार निधी वाटताना दुजाभाव करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी केला होता. आता महायुतीतही निधी वाटपावरून वाद पेटू लागलाय. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे आमदार आमनेसामने आलेत. नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे आणि हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात निधी वाटपावरून जुंपलीय.

निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील महायुतीतील दोन नेते भिडलेत. निधीवरून नाराजी व्यक्त करणाऱ्या शिवसेनेच्या आमदाराला भाजप नेते अतुल सावे यांनी थेट बुहमताचा आकडा दाखवत, त्यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराने त्यांना सुनावलंय.

आमच्याकडे पाच वर्ष २३७ आमदार आहेत, त्यामुळे ज्यांना महायुतीत राहायचं आहे त्यांनी राहा, नाहीतर बाहेर पडा असा इशारा भाजप नेते अतुल सावे यांनी दिला होता. सावेंच्या इशाऱ्यावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या आमदाराने त्यांना खडेबोल सुनावले. मिळालेले २३७ आमदार एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडून आलेत, त्यामुळे माज करू नका, असं उत्तर हदगावचे शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर दिलंय.

आमदार बाबूराव कदम कोहळीकर हे तांडा वस्ती निधी वाटपाच्या मुद्द्यावरून नाराज झालेत. त्यांनी आपली नाराजी मंत्री अतुल सावे यांच्याकडे पत्राद्वारे कळवली. तसेच सावे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांचा निषेध करून असेही ते म्हणाले होते. कदमांच्या या भूमिकेनंतर मंत्री अतुल सावेही आक्रमक झाले, त्यांनी कोहळीकर यांना बहुमताच आकडा दाखवला. मी याची खूप काळजी करत नाही. पाच वर्षे आमच्याकडे २३७ आमदार आहेत. आम्ही युतीत काम करतोय. त्यामुळे ज्याला युतीत राहायचं नसेल, ते बाहेर जातील", असे म्हणत अतुल सावेंनी कोहळीकरांना डिवचलं होतं.

सावेंना कोहळीकरांचं उत्तर

अतुल सावेंना दिलेला इशारा आमदार बाबुराव कदमांना जिव्हारी लागला. त्यांनी सावेंना जोरदार उत्तर दिलंय. महायुतीच्या २३७ आमदारांचा उल्लेख करत त्यांनी सावेंना माज करून नका, असा इशारा दिला. हे २३७ जे बहुमत मिळाले त्याचा कोणी माज करून नये, कारण विधानसभेच्या निवडणुकीवेळी कोणाच्या चेहऱ्यामुळे २३७ चा आकडा पार झाला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये.

" जेव्हा कोणताही निधी मंत्रीकडून मंजूर होत असतो तेव्हा तिथल्या स्थानिक आमदारांना विचारलं पाहिजे. आम्ही तुमच्याकडे इतका निधी देत आहोत, पण असा प्रकार कुठेही झाला नाही. त्यामुळे २३७ फक्त एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर करून मिळले आहेत, असं आमदार कोहळीकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT