Mahayuti Crisis After Sunil Tatkare Nashik Visit  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार-शिंदे गटात जुंपली; सुनील तटकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीत तणाव VIDEO

Mahayuti Crisis After Sunil Tatkare Nashik Visit: विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार-शिंदे गटात जुंपली असल्याचं समोर आलं आहे. सुनील तटकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीत तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

राज्यात काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येवून ठेपल्या आहेत. त्याअगोदर मात्र आता महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांचा नाशिक दोरा झाला. परंतु आता या दौऱ्यानंतर महायुतीत तणाव वाढल्याचं दिसत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

नाशिक दौऱ्यावर असताना सुनील तटकरेंनी नरहरी झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यानंतर मात्र महायुतीमध्ये अजित पवार आणि शिंदे गटात जुंपली असल्याचं चित्र निर्माण (Maharashtra Politics) झालंय. झिरवळ यांच्या उमेदवारीमुळे दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले नाराज झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

अजित पवार-शिंदे गटात जुंपली

दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते (Eknath Shinde) आणि माजी आमदार धनराज महाले यांनी ' तटकरेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार काय?' असा सवाल विचारला आहे. त्यामुळे वातावरण आणखीनच तापलंय. उमेदवारीचा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असं देखील धनराज महाले म्हणाले आहेत, मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती महालेंनी दिलीय.

धनराज महालेंचा गंभीर आरोप

शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी दावा केलाय की, प्रवेश केला तेव्हाच मुख्यमंत्र्यांकडून शब्द मिळालेला आहे. झिरवळ (Ajit Pawar) कुटुंबियांकडून लोकसभेत विरोधात काम झाल्याचा गंभीर आरोप धनराज महाले यांनी केलाय. महाले यांच्या दाव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. याबाबत (Vidhan Sabha Election) पक्षातील वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT