Maharashtra Politics : दोन महिन्यात सरकार जाणार, राजकारणात मोठा भूकंप होईल; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Maharashtra Political News : दोन महिन्यात सरकार जाणार आहे. राजकारणात मोठा भूकंप होईल,असं भाकित ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यावे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam tv
Published On

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्येही राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दुसरीकडे आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु आहे. या आमदार अपात्र सुनावणीबाबत बोलताना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सुप्रीम कोर्टात आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टातील सुरु असलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागले असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळेस मात्र काही ना काहीतरी खूप मोठा भूकंप होईल. आमच्या जिल्ह्यातील पाच जण फुटले, त्यातले चार जण या १६ पैकी आहेत, असे खैरे म्हणाले. 'पण या वेळेस शंभर टक्के मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल, आम्ही तर म्हणतोय की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री बनतील, असा विश्वासही चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.

Uddhav Thackeray
Shivsena vs MNS Clash: आधी कॉलर पकडली, नंतर ढकलून दिलं; वरळीत मनसे अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, पाहा VIDEO

अब्दुल सत्तार यांच्याविषयी बोलताना खैरे म्हणाले, 'पालकमंत्री होऊन अब्दुल सत्तार दोन महिने मजा करतील. त्यानंतर सरकार जाणार आहे'. यावेळी विधानसभा निवडणुकीविषयी खैरे यांनी भाष्य केलं. 'मला जर उद्धव ठाकरेंनी सांगितलं बंडखोरांना पाडण्यासाठी तुम्ही सक्षम आहात, तर मी लढायला तयार आहे. मी पश्चिम मतदारसंघाचा पहिला हिंदू आमदार आहे. पुढे दिल्लीत 20 वर्षांसाठी गेलो'.

Uddhav Thackeray
Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे उपशहरप्रमुखावर टोळक्याचा हल्ला; मारहाणीत मिलिंद मोरे यांचा मृत्यू

आरक्षणावर भाष्य करताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, ' उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करतील. संजय शिरसाट बोलणारे कोण आहेत. ते तर सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आहेत. सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत काही बोलत नाहीत म्हणून हे रोज भांडण चाललंय'. दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या टीकेनंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com