Shivsena vs MNS Clash: आधी कॉलर पकडली, नंतर ढकलून दिलं; वरळीत मनसे अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, पाहा VIDEO

MNS & Thackeray Group Clash in Worli: वरळीत मोठा राजकीय राडा झाला. वरळीत ठाकरे गट आणि मनसैनिक भिडले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची कॉलर धरली.
वरळीत मोठा राडा; ठाकरे गट आणि मनसैनिक भिडले, कार्यकर्त्यांनी एकमेकांची कॉलर धरली, VIDEO
MNS and Thackeray group clash : Saam tv
Published On

मुंबई : वरळीत जांभोरी मैदानातील बांधकामावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या बांधकामाच्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली. वरळीतील या बांधकामावरून मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यानंतर ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची कॉलर धरली. दोन्ही कार्यकर्त्यांच्या बाचाबाचीचा व्हिडिओ समोर आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वरळीत ठाकरे गट आणि मनसेचे पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. वरळीतील जांबोरी मैदानात आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या एका खोलीला मनसे कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. या बांधकामाच्या विरोधात मनसेने विरोध दर्शवत आक्रमक भूमिका घेतली आहे.

वरळीत मोठा राडा; ठाकरे गट आणि मनसैनिक भिडले, कार्यकर्त्यांनी एकमेकांची कॉलर धरली, VIDEO
Amol Mitkari vs MNS : राज ठाकरेंना 'सुपारीबाज' म्हणणाऱ्या अमोल मिटकरींची कार फोडली; अकोल्यातील वादाचा VIDEO समोर

मैदानाच्या बाहेर बांधकाम करा, मैदान हे मुलांसाठी आहे, अशी भूमिका मनसेची आहे. याच मैदानाच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. जांभोरी मैदान येथे करण्यात आलेल्या आमदार निधीतील बांधकामाला मनसेचा विरोध आहे. यासाठी मनसेचे वरळी येथील विधानसभेचे संभाव्य उमेदवार संदीप देशपांडे आणि मनसेचे कार्यकर्ते जांभोरी मैदानात उतरले आहेत.

वरळीत मोठा राडा; ठाकरे गट आणि मनसैनिक भिडले, कार्यकर्त्यांनी एकमेकांची कॉलर धरली, VIDEO
Uddhav Thackeray : आरक्षणाचे अधिकार राज्यांना नाहीत, आमचा आरक्षणाला पाठिंबा; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

वरळीत जांबोरी मैदानात ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांचा वाद पोलीस स्टेशनला पोहोचला. वरळी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. तसेच खोटी माहिती देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाने पोलिसांकडे केली आहे. ठाकरे गटाच्या मागणीनंतर पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com