सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाच्या संघटनांनी ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या संघटनांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आज मंगळवारी मराठा समाजाच्या संघटनांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मराठा समाजाच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाचे अधिकार राज्यांना नाहीत. आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असणाऱ्या संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले,गेल्या महिन्यात संभाजीनगरमध्ये माझी भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने नाटक करून बैठक बोलावली. सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं. नेत्यांना बोलवण्यापेक्षा त्यांना बोलवावं. सरकार आंदोलनावर पोळी भाजत आहेत'.
'महाराष्ट्रची विल्हेवाट लावत आहेत. शिवसेनेची काही मदत हवी असेल, ती मी करेन. आरक्षणाचा मर्यादा वाढवायचा मुद्दा सरकारचा नाही. सगळ्यांनी मोदींकडे जावं. आरक्षणाच्या बाबतीत मोदी जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य असेल, असेही ते म्हणाले.
मुंबई बँकेवरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. 'बाहेर जाताना काही जण मला कलानगर गेटवर दिसले. रस्ता विषयाच्या घोटाळा आदित्य ठाकरेंनी मांडला. मुंबई बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा जीआर टाकला होता. पण तो तात्काळ मागे घेतला. रात्रीच्या गाठीभेटी करायचे, तसा हा व्यवहार आहे का? पशुसंवर्धन खात्याची ही जागा होती. मुंबईकरांना याचं उत्तर मिळालं पाहिजे. आमचं सरकार 2-3 महिन्यात येईल आणि आम्ही न्याय देऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उरण हत्या प्रकरणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'अंबादास दानवे तिथे भेट देऊन आले आहेत. अशा घटना घडत आहेत. राज्य सरकारचं याकडे लक्षच नाही आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.