Nilesh Rane issues a direct warning to Ravindra Chavan, escalating tensions in the Mahayuti alliance. saam tv
महाराष्ट्र

Mahayuti Clash: राणेंविरुद्ध चव्हाण संघर्ष शिगेला! महायुतीत वादाचा भडका, स्पेशल रिपोर्ट

Rane vs Chavan Clash: आमदार निलेश राणे आणि चव्हाणांमधला वाद थांबायला तयार नाही. आता तर निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांना थेट निर्वाणीचा इशारा दिलाय. कोकणात सुरू असलेलं हे धुमशान का आणि कसं सुरू झालं त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Suprim Maskar

  • निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद शिगेला

  • राणेंनी दिलेल्या थेट इशाऱ्यामुळे महायुतीत तणाव अधिक वाढला.

  • या संघर्षामुळे शिंदेसेना–भाजप संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता

शिंदेसेनेच्या निलेश राणेंचा हा इशारा आहे थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना. मुळात मालवणमधील भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरावर धाड टाकत निलेश राणेंनी पैशांची बॅगच समोर आणत भाजप प्रदेशाध्यक्षांवर हल्लाबोल केला. आणि महायुतीत आरोप-प्रत्यारोपाची मालिकाच सुरु झाली. त्यात आता पुन्हा निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर माझ्या लफड्यात पडू नका मी थेट आऊट करतो, असा इशाराच भाजपला दिलाय.

खर तर चव्हाण विरुद्ध राणे या संघर्षाला सुरुवात झाली ती रवींद्र चव्हाण यांच्या मालवण दौऱ्यानंतर. दौऱ्यानंतर मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकली. ज्यानंतर रविंद्र चव्हाण आणि निलेश राणेंमधला संघर्ष शिगेला पोहचला.हा वाद सुरू असतानाच नितेश राणेंनीही या वादात उडी घेत आपलयाच बंधूवर टीका केली.

हा वाद एवढ्या टोकाला गेला की 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असं वक्तव्य करणाऱ्या रविंद्र चव्हाणांनी राणेच्या आजच्या इशाऱ्यावरही तेवढचं सडेतोड प्रत्युत्तर दिलयं. सिंधुदुर्गमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत सुरु असणारा हा संघर्ष राज्यातील महायुतीच्या अस्तित्वावरच घाला घालणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.

एकीकडे राणे बंधूंमध्ये तणाव वाढलाय. तर दुसरीकडे निलेश राणेंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात आरोपाची राळ उठवली आहे. आता महायुतीलाच सुरूंग लावणाऱा हा वाद शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog: उद्या बनणार पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींचा पैसा आणि संपत्ती दुप्पटीने वाढणार

Makar Sankranti 2026: केवळ फॅशन म्हणून नाही तर का घालतात संक्रांतीला हलव्याचे दागिने? जाणून घ्या खरं कारण

जिल्हा परिषद, पंचायत समितीचा शंखनाद! कधी आणि कोणती निवडणूक होणार? जाणून घ्या A टू Z माहिती|VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबई नेरुळमध्ये अडीच लाख रुपये जप्त; मतदारांच्या यादीसह एकाला ताब्यात

Municipal Election 2026: प्रचाराची मुदत संपली, तरी उमेदवाराला घरोघरी प्रचार करता येणार; निवडणूक आयोगाचा अजब निर्णय

SCROLL FOR NEXT